नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन
मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटी निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणीचे निवेदन मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना दिले आहे.
नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. मालवण नगरपरिषद हद्दीतील मामा वरेरकर नाट्यगृह हे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. नाट्यगृहाची इमारत जुनी झाल्यामुळे खुर्चा, रंगकाम, विद्युत व्यवस्था, बसण्याची व्यवस्था तसेच इतर नागरी सुविधा यामध्ये दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर आवश्यक दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, हे काम तातडीने करणे आवश्यक आहे. सदर दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर नाट्यगृहाची सुरक्षितता व उपयुक्तता वाढेल तसेच नागरिकांना व विविध सांस्कृतिक संस्थांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील. तरी मामा वरेरकर नाट्यगृहाच्या दुरुस्ती साठी एक कोटी निधी उपलब्ध करुन द्यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.
आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण शहर विकासासाठी कटिबद्ध
माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार निलेश राणे साहेब यांच्या नेतृत्वात मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी सांगितले.












