कणकवली येथे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘दर्पण Idol 2026’ या जिल्हास्तरीय कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘दर्पण Idol 2026’ या जिल्हास्तरीय कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा कणकवली येथील मराठा समाज मंडळ हॉल येथे पार पडणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायकांना आपली कला सादर करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

स्पर्धेत विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ७ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येतील.
स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे. पहिल्या फेरीत हिंदी आणि मराठी गीते, तर दुसऱ्या फेरीत बुद्ध आणि भीम गीते सादर करावी लागतील. पहिल्या फेरीतून १५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल.
ही स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून, फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना सहभाग घेता येणार आहे.

नावनोंदणीची अंतिम तारीख ५ एप्रिल २०२६ असून, इच्छुक स्पर्धकांनी दिलेल्या क्रमांकावर गाण्याचा ट्रॅक पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.