“विद्यार्थ्यांनी अभ्यास करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे” – सौ प्राची ईसवलकर
खारेपाटण (संतोष पाटणकर) : “आजचे विद्यार्थी खरच भाग्यवान असून शासनाच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशीच शालेय दप्तर,वह्या, गणवेश,पुस्तके व गोड मिठाई वाटून तुमचे शाळेत स्वागत केले जात आहे.ही खूप आनंददायी बाब असून विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला अभ्यास करून आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करावे.”असे भावपूर्ण उदगार जि.प.सदस्या सौ प्राची ईसवलकर यांनी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा प्रवेशोस्तोव कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना काढले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून जि.प.सदस्य प्राची ईसवलकर,सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्न श्री संतोष पाटणकर, खारेपाटण ग्रा.पं.सदस्य अस्ताली पवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी उपाध्यक्ष श्री मंगेश ब्रम्हदंडे,श्री सुहास राऊत, श्री संदीप सावंत,जि.प.केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.शाळेया वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले .प्रारंभी सर्व नवागत विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने महिला शिक्षकांनी कुंकू तिलक लावून व पुष्पगुच्छ देऊन आणि आरती ओवाळून तसेच गोड मिठाई वाटून स्वागत केले.
यावेळी शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय,गणवेश, वह्या,पुस्तके उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते वाटण्यात आली.तर सहयोग फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या स्कूल बॅग चे वितरण यावेळी जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी इयत्ता पहिली मध्ये नव्याने दाखल होणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे सफेद कोऱ्या कागदावर उमठविण्यात आले.या पायाच्या ठशाची एक प्रत पालकांना देण्यात आली.तर एक प्रत शाळेकडे रेकॉर्डला ठेवण्यात आली.या सुंदर उपक्रमाचे पालकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
“खारेपाटण जि.प. केंद्र शाळा ही राज्यातील आदर्श मॉडेल स्कूल म्हणून महाराष्ट्र शासनाने मान्यत दिलेली शाळा असून या शाळेत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ हा उज्ज्वल असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी ही शाळा असून गेली १० वर्षे सातत्याने १०० च्या वर पटसंख्या कायम ठेवणारी ही मराठी शाळा असून येथील शिक्षक व व्यवस्थापन समिती त्यासाठी करत असलेल्या प्रयत्नाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.असे प्रतिपादन येथील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर यांनी शाळा प्रवेशोस्तव कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.”
हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीम.शीतल राठोड,श्री मिलिंद सरकटे,साहाय्यक शिक्षक श्रीम.आरती जोजन,समीक्षा राऊत,दीपिका चव्हाण,आश्विनी चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले.तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांनी केले.













