१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपकेंद्र वागदे येथे लॅपटॉप प्रदान
कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वागदेचे सरपंच संदीप सावंत यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपकेंद्र वागदे येथे HP कंपनीचा लॅपटॉप प्रदान केला. या उपक्रमामुळे उपकेंद्रातील प्रशासकीय तसेच आरोग्यविषयक कामकाज अधिक सुलभहोणार असून नागरिकांना शासकीय सेवा जलद गतीने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
लॅपटॉप उपलब्ध करून दिल्याबद्दल उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरपंच संदीप सावंत यांचे आभार मानले.
यावेळी ग्रामसेवक युवराज बोराडे, आरोग्य सहाय्यक गंगाधर पाटील, लक्ष्मण घाडीगांवकर, प्रवीण घाडीगावकर, ममता सावंत, उमेश घाडीगावकर, पूजा चव्हाण, संजय घाडीगांवकर, अश्विनी तावडे, समुदाय आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.












