कणकवलीतील स्वामी समर्थ केंद्रावर अखंड नाम जप यज्ञ सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, स्वामी समर्थ सेवक व अध्यात्मिक विकास मार्ग, दिंडोरी प्रणित कणकवली केंद्र येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त ९ ते १५ एप्रिल या कालावधीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ८ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वा. श्री स्वामी समर्थ महाराजांची पालखी शिवाजी महामाज पुतळा ते जुना नरडवे रोडपर्यंत काढण्यात येणार आहे. ९ एप्रिल रोजी यज्ञभूमी मंडळ, देवता स्थापना, अग्नि स्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार, १० रोजी नित्य स्वाहाकार, गणेशयाग, मनोबोध याग, ११ रोजी नित्य स्वाहाकार, चंडी याग, १२ रोजी नित्य स्वाहाकार, स्वामी याग, १३ रोजी नित्य स्वाहाकार, गीताई याग, १४ रोजी नित्य स्वाहाकार, रुद्र याग, मल्हारी याग तसेच १५ रोजी नित्य स्वाहाकार, बली पूर्णाहूती, सत्यदत्त पूजन, सांगता समारंभ होणार आहे. तसेच सकाळी ५ वा. सामूहिक गुरुचरित्र पारायण वाचन, ७.३० वा. औदुंबर प्रदक्षिणा, ८ वा. स्वामींची भूपाळी आरती, ८.३० वा. नित्य स्वाहाकार, १०.३० वा. स्वामींची नैवेद्य आरती, १०.४५ वा. विशेष याग, दुपारी २ वा. स्वामी चरित्र सारामृत, दुर्गासप्तशती पाठ, सायंकाळी ५.३० वा. औदुंबर प्रदक्षिणा, ६.३० वा. स्वामींची नैवेद्य आरती व ६.४५ नंतर मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.