वेंगुर्त्यात २१ पासून ‘गरुडझेप महोत्सव’

जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळातर्फे आयोजन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले शहरातील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ राऊळवाडातर्फे सलग चौथ्या वर्षी गरूडझेप महोत्सव २०२६’ अंतर्गत ‘झेप सामाजिक कार्याची अनुषंगाने २१ ते २३ मार्च या कालावधीत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मीना पार्क, राऊळवाडा येथे रक्तदान शिबीर, सायंकाळी ७ वाजता राऊळवाडा येथील नायरा पेट्रोलपंप नजीकच्या समोरील जागेत जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रु.८ हजार, ५ हजार व ३ हजार आणि आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी स्वप्नील पालकर ८४८२८३५३९३ यांच्याशी संपर्क साधावा.

रविवार, २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता सातेरी मंदिर नजीकच्या शाळा नं. ४ येथे जिल्हास्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धा चार गटात ठेवण्यात आली आहे. यात प्राथमिक गट-पहिली ते दुसरीसाठी रंगभरण स्पर्धा, तिसरी ते चौथी गटास विषय कुंडीतील फुलझाडे, पाचवी ते सातवी गटांस विषय वासुदेव तर आठवी ते दहावी गटास विषय सार्वजनिक विहीर असे आहेत. सायंकाळी ५ वाजता मोड आलेल्या कडधान्यावर आधारीत पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी मंगेश परब ८१४९६१७२०९ यांच्याकडे संपर्क साधावा.

या स्पर्धांचे बक्षीस वितरण ७ वाजता होणार आहे. रात्री ८ वाजता राऊळवाडा येथील नायरा पेट्रोलपंप नजीकच्या समोरील जागेत चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ आयोजित जलवा २०२६ आणि सोबतच ‘वेंगुर्ला क्वीन २०२६’ स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी बापू वेंगुर्लेकर ९६०४२६२७३३ यांच्याशी संपर्क साधावा, विजेत्या तीन क्रमांकास अनुक्रमे ५ हजार, ३ हजार २ हजारची रोख बक्षिसे व आकर्षक चषक आहेत.

२३ मार्चला सायंकाळी ७ वाजता राऊळवाडा नायरा पेट्रोलपंप नजीकच्या जागेत सत्कार समारंभ, रात्री ८ वाजता वेंगुर्ल्यामध्ये प्रथमच शिमगोत्सव स्पर्धा २०२६’ होणार आहे. विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना १५ हजार, १० हजार, ५ हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी गौरव राऊळ यांच्याशी संपर्क साधावा. याव्यतिरीक्त गरूडझेप महोत्सवानिमीत्त रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा विषय गरूडझेप महोत्सवातील कार्यक्रमांवर क्रीएटीव्ह रिल तयार करणे असा आहे. या स्पर्धेतील प्रथम दोन क्रमांक विजेत्यांना रोख रू. ३ हजार व रू. २ हजार आणि आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विविध स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी गौरव राऊळ ७८८८२००९११ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ, राऊळवाडाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.