कणकवली (प्रतिनिधी) : “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!” असा महामंत्र देऊन मरणासन्न समाजाला स्वाभिमानाने जगायला शिकवणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कणकवली तालुक्यातील असलदे येथील समाज मंदिरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना खजिनदार मिलिंद तांबे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले .
आज दिनांक 14 एप्रिल 2026 सकाळी 10.00 वाजता असलदे बौद्ध वाडी येथील समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मिलिंद तांबे पवन तांबे सुभाष तांबे गौतम तांबे आदर्श तांबे सानिका तांबे सलोनी तांबे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आपले प्रेरणादायी विचार मांडले .
तसेच या कार्यक्रमाला वाढीतील सर्व अबालरुद्ध मोठ्या संख्येने सहभागी होते सुमेध तांबे, रोहन तांबे, विकी तांबे, साहिल तांबे, प्रशांत तांबे, सुधीन तांबे, गौतम तांबे, प्रकाश तांबे, सुभाष तांबे,शितल तांबे वंदना तांबे, सानिका तांबे, सायली तांबे, पर्णवी तांबे, शिला पेडणेकर, सुषमा तांबे, सीमा तांबे, नंदा तांबे दीपाली तांबे, भारती तांबे, सोनिया तांबे, संजीवनी तांबे,, चैत्राली तांबे, आणि तेजस्विनी, सलोनी, रिया, अवनी तांबे, सानिका तांबे, प्रतिमा तांबे सुनील तांबे , सुदिन तांबे, साहिल तांबे, भावेश तांबे, सुदेश तांबे, रज्जत कांबळे , संतोष तांबे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव दिपेश तांबे यांनी केले.















