नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव देवगड निप्पाणी रोड वरील असलदे गावा नजीक असलेल्या सिमेंट मिक्सर प्लांट आहे. या प्लांटमुळे रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरले असून ये जा करणाऱ्या वाहनांना त्रास होत आहे.
सिमेंट मिक्सर प्लांट मध्ये अवजड वाहणांची ये जा सुरु असते. त्यामुळे माती रस्त्यावर येऊन रस्ता गलिच्च बनला आहे. त्यात वरचेवर पाऊस असल्यामुळे रस्ता सुळसुळीत झाला आहे. देवगड निप्पाणी रोड वर वाहनांची ये जा मोठ्या प्रमाणात असल्याने गाडी चालवताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. या बाबत ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त होत आहे.













