सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. कणकवली मालवण वेंगुर्ले आणि सावंतवाडी नगरपरिषद मध्ये होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सर्व उमेदवारांना रवींद्र चव्हाण आज मार्गदर्शन करून विजयाचा मंत्र देतील. निवडणूक प्रभारी तथा पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी 4 वाजता कणकवलीत, त्यांनतर मालवण वेंगुर्ले आणि सावंतवाडी येथे जाऊन रवींद्र चव्हाण उमेदवारांसोबत बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत. निवडणूक प्रचाराच्या आरंभीच खुद्द प्रदेशाध्यक्षणी सिंधुदुर्गात लक्ष घातल्या मुळे सर्व उमेदवारांना बळ मिळणार आहे एवढं निश्चित.












