सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या निकालात मुलींनीच वर्चस्व गाजवले आहे. राज्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला.
पुणे, मुंबईसह अनेक विभागांचा निकाल समाधानकारक लागला आहे. सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना https://mahahsscboard.in/ अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. (MSBSHSE result) राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी बारावीच्या निकालाबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
निकालाची महत्त्वाची आणि ठळक वैशिष्ट्ये काय?
राज्याचा एकूण निकालः ८९.७९%
मुलींचा निकालः ९३.१५%
मुलांचा निकालः ८६.८० %
सर्वात जास्त निकाल असलेला विभाग : कोकण
कोणत्या विभागाचा निकाल किती लागला?
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागातून १४ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यामध्ये कोकण विभागाने आपला दबदबा कायम राखला. मुंबई आणि पुणे विभागाचा निकालही चुरशीचा लागला आहे.
पुणे ९१.२५
नागपूर ८८.६७
छत्रपती संभाजीनगर ८८.६८
कोल्हापूर ८९.९७
अमरावती ९०.९२
नाशिक ९०..७२
लातूर ८४.१४
कोकण ९४.१४
मुंबई ९०.०८












