ऐन दिवाळीत ओमकार हत्तीचा मडुऱ्यात धुमाकूळ

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :सिंधुदुर्गात पुन्हा एकदा ओंकार हत्तीचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. मडुरा गावात हत्तीने अक्षरशः थैमान घातलं असून, घराशेजारी उभ्या असलेली मोटारसायकल पाडून त्यातवर पाय ठेवत ती चिरडून टाकत असल्याचा एका व्हिडिओत व्हायरल झाला आहे.या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.गावकऱ्यांनी दूरून घेतलेले दृश्यात ओंकार काही क्षणांतच संतापून घराशेजारी उभ्या असलेल्या मोटारसायकलवर पाय ठेवत ती नष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. गावकरी जोरात ओरडून ये ओंकार नको रे नको रे नको रे नको रे मोटर सायकल चिरडू नको रे चिरडू अशी विनवणी करत आहेत.

मडुरा हे गाव काही दिवसांपासून ओंकार हत्तीच्या दहशतीखाली आहे. रात्रीच्या वेळी तो गावात शिरतो आणि शेतातील केळी, भात तसेच नारळाच्या झाडांचे नुकसान करतो. गावकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.