Breaking News

रायगड जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समितीची खारेपाटण प्रा.आ.केंद्राला सदिच्छा भेट

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अभ्यास दौऱ्यावर आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती श्रीम.रसिका केनी यांच्या नेतृत्वाखाली समिती पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्रा.आ.केंद्राला सदिच्छा भेट दिली.

या समितीचे स्वागत खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला बाल कल्याण समिती सभापती श्रीम.नारकर मॅडम व कणकवली पं.स.सभापती श्रीम.हर्षदा वाळके मॅडम यांनी केले.यावेळी महिला बाल कल्याण समिती सदस्य सौ अवनी तेली,पं.स.सदस्य गुरुप्रसाद शिंदे,जन आरोग्य समिती सदस्य श्री विजय देसाई,भाऊ राणे, ग्रा पं. सदस्य क्षितिजा धुमाळे,आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.तर तालुका आरोग्य सहाय्यक श्री वावळे,खारेपाटण प्रा.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम,डॉ.सागर तरटे,अंगणवाडी मुख्यसेविका श्रीम.बुचडे,अशा स्वामसेविका गट प्रवर्तक श्रीम. संकिता पाटणकर,आरोग्य सहाय्यक कैलास वाणोळे,हिवताप अधिकारी श्री भागवत,फार्मसिस्ट भारती डोंगरे,व खारेपाटण विभागातील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अभ्यास दौऱ्यावर आलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील महिला बाल कल्याण समिती मध्ये सभापती रसिका केनी समिती सदस्या मानसी दळवी,उर्वशी वाडकर,मनाली काळीजकर,रंजना वासकर,स्मिता पाटील,वीजया पाशिलकर,वर्षा दोरे, सुवर्णा ठाकरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी निर्मला कुचिक यांचा समावेश होता.या समितीने खारेपाटण प्रा.आ.केंद्राची पाहणी करून येथील कामकाजा विषयी समाधान व्यक्त करून कर्मचारी वर्गाचे कौतुक केले.तर महिला लोकप्रतिनिधीच्या या अभ्यास दौऱ्या दरम्यान समिती सदस्यांनी खारेपाटण येथील ऐतिहासिक किल्ल्याला देखील भेट दिली.
यावेळी खारेपाटण प्रा.आ. केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.वडाम यांचे नेतृत्वाखाली सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने अभ्यास दौऱ्या निमित्त आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे गुलाब वृक्ष भेट देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.