Breaking News

मालवणी गाऱ्हाण्याने एम 2 एम प्रिन्सेस विजयदुर्गकडे रवाना

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबईतील भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) येथून आज सकाळी ८ वाजता पहिली फेरी विजयदुर्गच्या दिशेने रवाना झाली. या सेवेचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला असून, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ‘M2M Princess’ ही हाय-स्पीड फेरी (दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रो-रो) वापरात आणण्यात आली आहे.या सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) असा प्रवास आता केवळ ६ ते ७ तासांत पूर्ण होणार आहे, ज्यामुळे रस्त्यावरील १०-१४ तासांच्या प्रवासापेक्षा मोठी बचत होईल. प्रवासी आपली दुचाकी आणि चारचाकी वाहने सोबत नेऊ शकतात. पहिल्या फेरीला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, बुकिंग जवळपास फुल्ल झाल्याचे सांगितले जात आहे. शिमगा (होळी) आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात ही सेवा पर्यटन आणि व्यापाराला मोठी चालना देणार आहे.ही सेवा सुरुवातीला प्रायोगिक टप्प्यात (पायलट फेज) सुरू असून, मार्च महिन्यात १६ दिवसांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भविष्यात मुंबई-कोकण दरम्यान ही जलवाहतूक सेवा मुख्य पर्याय ठरेल, असा विश्वास वर्तवला जात आहे.कोकण प्रवास आता अधिक सुखकर, वेगवान आणि आनंददायी होणार आहे.