कणकवली (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या १४ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त शहरविकास आघाडीच्यावतीने शहर मर्यादित पाककला स्पर्धा रविवारी, १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा नगरवाचनालय हॉल, कणकवली येथे सायंकाळी ४ वाजता होणार आहे.
या स्पर्धेची थीम ‘नॉनव्हेज युनिक रेसिपी’ आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ३००० रु. ची आकर्षक भेटवस्तू, द्वितीय पारितोषिक २००० रु.ची भेटवस्तू तृतीय पारितोषिक १००० रु.ची भेटवस्तू, उत्तेजनार्थ २ क्रमांकांना ५०० रु. ची भेटवस्तू अशी पारितोषिके आहेत.
शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी शीतल मांजरेकर-८६००२९२९०४, दिव्या साळगावकर, जाई मुरकर व स्नेहा वाळके यांच्याशी संपर्क साधावा.













