Breaking News

कुडाळ व मालवण तालुक्यातील ६ प्रवासी मार्ग निवारा शेडसाठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर !

मालवण (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यात मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील आंब्रड, आवळेगाव, माणगाव या ठिकाणच्या जीर्ण व नादुरुस्त झालेल्या शेड साठी प्रत्येकी २० लाख या प्रमाणे एकूण १ कोटी २० लाख एवढा निधी पहिल्या टप्यात मंजूर झाला आहे. या कामाची प्रशासकीय मान्यता झाली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात आहे, लवकरच जुन्या शेड हटवून नवीन बांधकामाला सुरुवात होईल.