वैभववाडी (प्रतिनिधी) : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटात आज दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. दरड कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात माती व दगडांचा ढीग रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
घटनेनंतर घाटातील दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित यंत्रणेकडून रस्त्यावर आलेली माती व दगड हटविण्याचे काम सुरू करण्याची तयारी करण्यात येत असून, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













