Breaking News

कोळंबमध्ये तरुणाची आत्महत्या

मालवण (प्रतिनिधी) : कोळंब मधलीवाडी येथील योगेंद्र श्रीकांत कोळंबकर (३६) या तरुणाचा मृतदेह त्याच्या घराच्या परिसरात गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला आहे. पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. कुटुंबियांनी पोलिसात माहिती दिल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता.

योगेंद्र याला ‘बाळा’ या टोपननावाने ओळखले जात होते. तो चालक म्हणून काम करत असे. घरामध्ये शुक्रवारी सकाळनंतर तो दिसून आला नव्हता. दुपारी शोधाशोध केली असता, त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला.

त्याच्या पश्चात आई, बहीण, भावोजी असा परिवार आहे. याप्रकरणीअधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर करीत आहेत.