Breaking News

फिरायला आलेल्या मुंबईतील तरुणाचा कोकिसरे येथे बुडून मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील शेततळीत मुंबईतील तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी सायंकाळी घडली असून सिद्धांत प्रकाश जाधव वय 24 असे मयताचे नाव असून कणकवली तालुक्यातील नरडवे हे मूळ गाव आहे.

मुंबई सांताक्रुज येथील राहणारे मित्र फिरण्यासाठी कोकिसरे येथील प्रसाद वळंजू यांच्या गावी कोकिसरे येथे आले होते शनिवारी दुपारी मित्राच्या घरी जेवण करून 3.30 वाजता अंघोळीसाठी गणपती विसर्जन शेततळीत उतरले जीवाची मज्जा करण्यासाठी आलेल्या ह्य मित्रांनी सोबत चिकन आणि दारु नेली होती कौलावर चिकन फ्राय करून काहीजण खात होते काही दारु पीत होते तर काही पाण्यात अंघोळी करीत होते सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा कार्यक्रम सुरु होता एकूण 15 जण मित्र होते प्रत्येजण आपल्याच नादात होतात थोडी दारुची नश्या होती त्यामुळे सिद्धांत पाण्यात कधी बुडाला याचा इतर मित्राना अंदाज आला नाही 6.30 वाजता घरी जाण्यासाठी निघताना आपला एक सहकारी कुठे दिसत नाही हे लक्षात येताच शोधाशोध सुरु झाली पण कुठे दिसून आला नाही अंघोळीला जाताना सिद्धांत जाधव याने कपडे, चप्पल आणि मोबाईल थेथे दिसून आला यावेळी सर्वांनाच आपला मित्र पाण्यात बुडाला असावा असा अंदाज आला म्हणून पाण्यात शोध घेतला गावचे सरपंच, पोलीसपाटील यांना या घटनेची खबर दिली पोलिसांना खबर देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद वळंजू यांच्यासह मुंबईतील 14 मित्रांचा गट 10 जुलै रोजी कोकिसरे येथे फिरण्यासाठी आला होता. 11 जुलै रोजी सर्वांनी चिकन व दारुची पार्टी केल्यानंतर सायंकाळी साडेतीनच्या सुमारास कोकिसरे येथील सार्वजनिक गणपती विसर्जन होणाऱ्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. काही मित्र पाण्यात उतरले, तर काहीजण बंधाऱ्यावर बसले होते.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सिद्धांत जाधव दिसत नसल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्याचे कपडे, मोबाईल व चप्पल पाण्याजवळच आढळून आले. त्यानंतर मित्रांनी परिसरात शोधाशोध केली. गावचे पोलीस पाटील व सरपंच यांनाही माहिती देण्यात आली. रात्री वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन शोधमोहीम सुरु केली. मात्र अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.

रविवारी सकाळी पुन्हा पोलीस, मित्र व ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरु केली. सकाळी सुमारे 8.45 वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्यातील सुमारे 15 ते 20 फूट खोल पाण्यात सिद्धांत जाधव याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

या घटनेची नोंद वैभववाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.