Category दोडामार्ग

पहाटेच्या सापळ्यात खैर तस्कर अडकले; वनविभागाची धडक कारवाई

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग: कसई येथील वनक्षेत्रात सुरू असलेल्या खैर वृक्षांच्या अवैध तोडीवर वनविभागाने धाडसी कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमारे ₹3 लाख 71 हजार 773 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे खैर तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठा…

दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात; तीन महिन्यांत सेवा सुरू होणार!

आमदार दीपक केसरकर यांचे प्रतिपादन; आरोग्यमंत्र्यांकडून ५ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर दोडामार्ग (प्रतिनिधी) : तालुक्याला जनतेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत हे रुग्णालय जनतेच्या सेवेत दाखल होईल, अशी ग्वाही…

रोजगाराच्या खाणीत उद्योगाऐवजी उत्खनन करून रात्रीस खेळ करणारा ‘पुष्पा’ कोण ?

दोडामार्ग (प्रतिनिधी) : आडाळी एमआयडीसीच्या माध्यमातून बेकार युवक-युवतीना रोजगार मिळावा तालुक्याचा उद्योग धंद्यातून विकास व्हावा म्हणून आडाळी एमआयडीसी उभारण्यात आली. मात्र, या एमआयडीसीच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्याचा विकास झाला नाही तर अवैध खनीज युक्त माती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचा विकास नक्कीच…

दोडामार्गात आमदार प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत

सिंधुदुर्ग दौऱ्याची सुरुवात; भाजपा पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत दोडामार्ग (प्रतिनिधी) : विधानपरिषद आमदार म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार प्रमोद जठार हे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता दोडामार्ग तालुक्याला त्यांच्या स्वागताचा पहिला मान मिळाला. भाजपा पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ व हार घालून त्यांचे…

सासोली येथे गवा रेड्याची चालत्या कारला जोरदार धडक; महिला गंभीर जखमी, कारचे मोठे नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी) : सासोली येथील तिलारी कालव्या नजीक दोडामार्ग-बांदा मुख्य रस्त्यावर आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चालत्या अल्टो कारवर गवा रेड्याने अचानक धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात गाडीचे देखील हजारो…

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उघड !

कृती समितीच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर दोडामार्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जनता आरोग्य दरबारच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव उघडकीस आले असून, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत गंभीर त्रुटींचा भडिमारच समोर आला…

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी संजय गवस यांनी घेतली सदिच्छा भेट !

शिवसैनिकांत नवचैतन्य दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांनी मुंबईत ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी पुष्पगुच्छ देऊन ठाकरे यांचे स्वागत केले. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या संजय…

दोडामार्गात डॉ. बाबासाहेब आंबेडकर 135 व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन

दोडामार्ग (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती दोडामार्गच्या वतीने खुली मोठया व लहान गटात वत्कृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दोडामार्ग तालुक्यात महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

तिलारी खोऱ्यातून ‘ओंकार’ हत्तीची सासोलीकडे पुन्हा वाटचाल

दोडामार्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा परिसरात परिचित असलेला ‘ओंकार’ हत्ती ऐन काजू हंगामात पुन्हा एकदा सासोली परिसरात दाखल झाला असून, काजू गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यांना त्याचे अचानक दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळच्या सुमारास…

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी दिल्या नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांना शुभेच्छा

वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांच्या निवडीनंतर पंचायत समिती कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पणन महासंघाचे संचालक तथा जि.प सदस्य प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे,…