Category मालवण

मोठी दुर्घटना; दांडी समुद्रात बनाना राईड करताना महिला पर्यटकाचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी) : दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. बनाना राईड दरम्यान समुद्रात पडून मुंबईतील अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (वय ४५) या पर्यटक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेआठ…

पर्यटकांच्या अर्टिगा कारची उभ्या असलेल्या बॅलेनो कारला धडक; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

कुंभारमाठ येथील दुर्घटना; अर्टिगा मधील चार युवक जखमी मालवण (प्रतिनिधी) : पर्यटनासाठी मालवणात आलेले पर्यटक हे माघारी फिरत असताना त्यांच्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बॅलेनो कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार युवक जखमी झाले. ही धडक इतकी जबरदस्त…

राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत तेजू पडवळकर यांची बैलजोडी विजेती !

राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजन मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मालोंड सडा येथे राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेत प्रथम क्रमांक गवाणे येथील तेजू पडवळकर यांनी, द्वितीय क्रमांक अभिनव राणे – कणकवली आणि तृतीय क्रमांक अविष्कार ठाकूर यांच्या…

आंतरराष्ट्रीय बिबट दिनी ‘त्याला’ मिळालं जीवदान!

विहिरीत पडलेल्या बिबटची वनविभागाकडून सुखरूप सुटका मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथे विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुखरूप सुटका करण्यात आली. शनिवारी रात्री स्थानिक ग्रामस्थ श्री. राजु मुणगेकर व ग्रामपंचायत लिपिक श्री. संदिप बुधवळेकर यांनी परिमंडळ मालवण, नियतक्षेत्र कांदळगाव…

चौके सरपंचपदी शिवप्रसाद चौकेकर मोठ्या मताधिक्याने विजयी

मतदारांचे मानले आभार चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत रिक्त सरपंच पदासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत शिवप्रसाद अंकुश चौकेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. चौके ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार शिवप्रसाद चौकेकर व अशोक चौकेकर या दोघांनी उमेदवारी…

केवळ उत्तरं नको; कामांचा ‘टाइम बाँड’ निकाल लावावा

आ. निलेश राणेंनी भरला आमसभेत सज्जड दम जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले मालवण (प्रतिनिधी) : तब्बल नऊ वर्षांनंतर मालवण तालुक्याची आमसभा आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साही आणि तितक्याच आक्रमक वातावरणात पार पडली. यापुढे आमसभा दरवर्षी होणार असून, प्रशासनाने केवळ…

पुण्यवचनावरून उठून केला बकरीचा उपचार

मालवण तालुक्यातील शिरवंडे गावांतील पशुसेवक निलेश गांवकर यांचे कौतुकास्पद काम मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पशुपालकांसाठी नेहमी तत्पर असलेले पशुसेवक निलेश गांवकर यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीचा उत्तम आदर्श दाखवून दिला आहे. नुकताच त्यांचा लग्न समारंभ पार पाडला आहे. लग्न कार्यातील…

स्पेशल प्रीमियर लीगचे अनिल कांदळकर यांच्या हस्ते उद्घाटन !

जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजारपेठ चे आयोजना मसुरे (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील जय हनुमान मित्र मंडळ विरण बाजार पेठ आयोजित स्पेशल प्रीमियर लीग चे उदघाट्न माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स.मालवण सभापती…

आगीत दुचाकी जळून खाक

मालवण देऊळवाडा येथील घटना मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील देऊळवाडा येथे चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आला. त्याने वेळीच दुचाकी चालकास सांगून दुचाकी थांबवली. स्थानिक…

मालवणी बझारच्या अध्यक्षपदी श्रीकृष्ण तळवडेकर यांची एकमताने निवड

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्था लिमिटेड संचलित मालवणी बझारच्या अध्यक्षपदी संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी अजय लक्ष्मण हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रियेची सभा पार पडली.…