Konkan News

Konkan News

कणकवली एस.टी. आगारचा विकास आराखड्यात आशियेकडे जोडणा-या रस्त्याचा समावेश करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आशिये सरपंच महेश गुरव यांची मागणी ; सकारात्मक चर्चा कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील आशिये येथील प्रस्तावित परिवहन महामंडळ कणकवली बसस्थानक विकासकामाला गती देण्यात यावी. तसेच या बसस्थानक व आगार विकसित होत असताना कणकवली ते आशिये…

आरोग्य कर्मचाऱ्यांच प्रश्न मार्गी; संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्री नितेश राणेंची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील आरोग्य विभागात १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या १५,०१० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदावर एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी…

NCC कॅडेट गार्गी ठोसरची सुवर्ण कामगिरी; IGC थल सैनिक कॅम्पमध्ये पटकावले सुवर्णपदक!

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : शेठ न.म.विद्यालय खारेपाटणची होतकरू आणि गुणवंत NCC कॅडेट कु.गार्गी प्रशांत ठोसर हिने अमरावती येथे दि.१४ ते २३ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या IGC थल सैनिक कॅम्पमध्ये नेमबाजी स्पर्धेत आपल्या कौशल्याची चमक दाखवत सुवर्णपदकावर…

सेवाभावी उपक्रमांमुळे समाजातील निराधार वंचित बांधवांना दर्जेदार वैद्यकिय सेवा मिळते- संदिप परब

संविता आश्रम पणदूर येथे दिवं.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त आरोग्य शिबिर संपन्न खारेपाटण (संतोष पाटणकर) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री दिवं.श्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी नुकतेच आरोग्य तपासणी व विशेष आरोग्य शिबिर अभियान…

देवगडात सौर व पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी

निनाद देशपांडे यांचे पालकमंत्री नितेश राणेंना निवेदन देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात सौर व पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणी भाजप कार्यकर्ते निनाद नितीन देशपांडे यांनी महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…

आरोसबाग तिठ्यावर दारुसह ६ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली एक्साईजची कारवाई बांदा (प्रतिनिधी) : जुना पत्रादेवी-बांदा रोडवरील आरोसबाग तिठ्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने धडक कारवाई करत गोव्यातून बेकायदा दारूची वाहतूक करणारी कार जप्त केली आहे. या कारवाईत ६ लाख ३१ हजार ७६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत…

तळेबाजार विठ्ठल मंदिरात अंगणवाडीतील बालकांची वारकरी दिंडी

विविध सांस्कृतिक कार्यक्रम : तळेबाजार व बागतळवडे येथील विद्यार्थ्यांचा सहभाग देवगड (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तळेबाजार व बागतळवडे येथील अंगणवाडीतील चिमुकल्यांनी तळेबाजार येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वारकरी परंपरेचे दर्शन घडवत आकर्षक वेषभूषेत वारकरी दिंडी काढली. विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम,…

CJP आंदोलकांचा मोठा विजय ! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

ब्युरो न्यूज (प्रतिनिधी) : आताची सर्वात मोठी बातमी आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरातून आंदोलन सुरू झाली. जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं. सोनम यांचं उपोषण मोडीत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.…

दुचाकीला स्विफ्टची जोरदार धडक ! कोलगाव मियासाब दर्गाजवळ भीषण अपघात; २ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोलगाव येथील मियासाब दग्र्याजवळ दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वारासह मागे बसलेल्या युवतीचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली स्विफ्ट कारचालकाला सावंतवाडी पोलिसांनी आज सकाळी अटक केली. या अपघातात कार्तिक अरविंद परब (वय…

चित्रकार शिवाजी राजाराम डोईफोडे यांची अनोखी कलाकृती

कणकवली (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध चित्रकार शिवाजी राजाराम डोईफोडे यांनी आपल्या सूक्ष्म चित्रकलेच्या कौशल्याचा उत्कृष्ट नमुना सादर करत तुळशीच्या नाजूक पानावर भगवान विठ्ठलाची प्रतिकृती साकारली आहे. अत्यंत बारकाईने आणि कलात्मकतेने रेखाटलेल्या या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, कला व भक्तीचा…