फोंड्यात गोवा दारू जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडा एसटी स्टँडजवळ कणकवली पोलिसांनी धाड टाकून ८ हजार ९०० रु.चा गोवा दारूसाठा जप्त केला. रामचंद्र दत्ताराम तांबे (फोंडा-हवेलीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हवालदार सुभाष शिवगण, कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांनी बुधवारी केली.








