Konkan News

Konkan News

फोंड्यात गोवा दारू जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडा एसटी स्टँडजवळ कणकवली पोलिसांनी धाड टाकून ८ हजार ९०० रु.चा गोवा दारूसाठा जप्त केला. रामचंद्र दत्ताराम तांबे (फोंडा-हवेलीनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई हवालदार सुभाष शिवगण, कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांनी बुधवारी केली.

देवगडमधील गुरांच्या कोंडवाड्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज १३ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन

मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार देवगड (प्रतिनिधी) : देवगड नगरपंचायतीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते गुरुवारी, आज दि. १३ ऑगस्ट दुपारी १.३० वाजता…

शेतकरी येणार रेकॉर्डवर…. महसूल विभागाच्या विविध अडचणी होणार दूर

पालकमंत्री नितेश राणे यांनी वेधले महसूल मंत्र्याचे लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आइडी, अॅग्रीस्टॅक तसेच महसूल नोंदीतील अडचणींमुळे कर्जमाफी व विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणींचा विषय पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयस्तरावर उपस्थित केल्याने आता राज्यातील…

दिगवळे बौद्धवाडीत मृत्यूनंतरही यातना स्मशानभूमीला शेड नसल्याने ताडपत्रीच्या आड अंत्यसंस्कार

कणकवली (प्रतिनिधी) : माणसाच्या जीवनातील शेवटचा प्रवासही सन्मानाने व्हावा, अशी अपेक्षा असते. मात्र, कणकवली तालुक्यातील दिगवळे बौद्धवाडी येथे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही यातना सहन करण्याची वेळ दहा ऑगस्ट रोजी ग्रामस्थांवर आली. स्मशानभूमीला शेड नसल्याने पावसात अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना ताडपत्रीचा आधार घ्यावा…

अवाढव्य कीटकनाशकांचा वापर टाळा !

लोरे नं. २ येथे कृषी सम्राट गटाकडून उपयुक्त व हानिकारक कीड तसेच रोग व्यवस्थापनावर गटचर्चा फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे स्थानिक पिकांवरील उपयुक्त व…

कणकवलीत हॉटेल-लॉजच्या पाठीमागे जुगार अड्ड्यावर छापा ; पाच जण ताब्यात

१५ हजार ४०० रुपयांची रोकड व पत्ते जप्त कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील एका हॉटेल-लॉजच्या पाठीमागे आडोशाला राजरोसपणे सुरू असलेल्या जुगार अड्डयावर कणकवली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत शहरातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिसांची चाहूल…

‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’तून नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घ्या

नागरिकांच्या गरजांवर आधारित प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’च्या माध्यमातून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण व लोकाभिमुख उपक्रम हाती घ्यावेत. जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देता येत…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली

कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानकापर्यंत निघणार रॅली; युवा, महिला, माजी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या सहभागी होणार कणकवली (प्रतिनिधी) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी…

कनकनगरच्या रस्ता रुंदीकरणाला सुरुवात; सुशांत नाईक यांच्या प्रयत्नांना यश

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक तसेच कनकनगर येथील नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी व परिसराच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. कनकनगर परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून, त्यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.रस्ता रुंद…

असलदे पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस पाटीलांकडे द्यावा

असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील गेल्या २ वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद,कोतवाल पदांवर नियुक्ती करण्यात यावी. असलदे गावाचा पोलीस पाटील पदाचा पदभार नांदगाव पोलीस…