Konkan News

Konkan News

कणकवली, सावंतवाडी मधील बंद सिटीस्कॅन सुविधा तात्काळ सुरू करा

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथील मोफत सिटीस्कॅन सुविधा बंद करण्यात आली आहे. संबंधित कंपनीला शासनाकडून देयक न मिळाल्याने बंद झालेली ही सिटीस्कॅन सुविधा लवकरात…

कणकवलीत गणेशोत्सवासाठी नगरपंचायतीचे व्यापक वाहतूक नियोजन

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे सहकार्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने अत्यंत व्यापक पातळीवर नियोजन सुरू केले आहे. शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण…

नांदगाव पंचक्रोशीत माकड पकड मोहीम राबवा

असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांची वनविभागाकडे मागणी; माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त कणकवली (प्रतिनिधी): नांदगाव पंचक्रोशीतील असलदे, नांदगाव, आयनल, कोळोशी, तोंडवली, बावशी तसेच परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माकडांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक व शेतकरी…

शरद पवारांची ‘सिल्वर ओक’वर भेट; मत्स्य व बंदर विकासाच्या विविध विषयांवर नितेश राणेंची सविस्तर चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आज मुंबईतील ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.यावेळी मंत्री नितेश राणे यांनी ससून डॉकच्या आधुनिकीकरणासंदर्भात मत्स्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती…

सिंधुदुर्गात सुरु होणार आधुनिक फेरीबोट सेवा

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा स्थानिक जहाजबांधणी, सागरी अभियांत्रिकी, पर्यटन आणि रोजगारालाही चालना मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक फेरीबोट सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाचा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री…

पुढील काळात एसटीच्या विनावाहक बससेवेला प्राधान्य

कणकवली (प्रतिनिधी) : एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी उत्पन्नवाढीवर भर देतानाच खर्चातही काटकसर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नावीन्यपूर्ण प्रयोग राबवावेत. विशेषतः विनावाहक बससेवेला प्राधान्य देऊन मनुष्यबळावरील खर्चात बचत करण्याबरोबरच प्रवाशांना अधिक सुलभ आणि गतिमान सेवा…

कणकवली महाविद्यालयात सिनेट सदस्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या पुढाकारातून उपक्रम; माजी आमदार वैभव नाईकांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी): मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी सोमवारी कणकवली महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कणकवलीचे उपनगराध्यक्ष तथा उबाठा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास माजी…

मुंबईत २५ नोव्हेंबर रोजी रंगणार ‘मालवणी अभिमान मेळा’

आमदार प्रमोद जठार यजमानी; ‘जय थय मालवणी’ संस्थेचा पुढाकार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी २५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. याच दिवसाचे औचित्य साधून ‘मालवणी अभिमान दिवस’ म्हणून साजरा करण्याची संकल्पना मुंबईस्थित ‘जय थय मालवणी’ संस्थेने पुढे आणली…

कासार्डेत दहीहंडीचा थरार! प्रमोद जठार मित्रमंडळाची मानाची हंडी फोंडाघाटच्या गोविंदांनी फोडली

१४ वर्षांची परंपरा कायम; हजारो गोविंदांच्या उपस्थितीत उत्साहाचा जल्लोष – ‘परंपरा जपा, संस्कृती पुढे न्या’ : आमदार प्रमोद जठार कासार्डे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक आणि सार्वजनिक जीवनात आपली वेगळी छाप निर्माण करणाऱ्या आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवाने कासार्डे येथे…

कासार्डे येथे “महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स” चा शुभारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : आरामदायी, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ या नव्या प्रवासी वाहतूक सेवेचा शुभारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. पर्यटकांना अधिक दर्जेदार व सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने…