Konkan News

Konkan News

सिंधुदुर्गात इंधन टंचाई? अफवांना बळी पडू नका -प्रशासनाचा इशारा !

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे आगमन होत असल्याने काही काळ इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेत BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी तसेच जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांशी समन्वय साधून…

कणकवली शहरात ४०० रूपयांची घरपट्टी होणार ४ हजार

नगरपंचायत सभेत प्रशासनाची माहिती पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे नगराध्यक्षांचे निर्देश कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील जुन्या घरांना ग्रामपंचायत दरानुसार घरपट्टीची आकारणी होत आहे. एक हजार चौरस फुटांच्या जुन्या घरांसाठी सध्या चारशे रूपये घरपट्टी आकारली जाते. मात्र नगरपंचायत क्षेत्रात नगरपंचायतीच्या…

जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवलीची दीक्षा चव्हाण ठरली ‘कॅरमक्वीन’

खुल्या कॅरम स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा पटकावले विजेतेपद सावंतवाडी (प्रतिनिधी) : भिरवंडे-कणकवली येथील दीक्षा नंदकिशोर चव्हाण हिने आपल्या जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरीय खुल्या कॅरम स्पर्धेचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकावले. सिंधुदुर्गच्या कॅरम इतिहासात पहिल्यांदाच खुल्या गटाचा अंतिम सामना दोन महिला खेळाडूंमध्ये…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नडगिवे अपघात स्पॉट ची कार्य अभियंता वृषाली पाटील यांजकडून पाहणी

“महार्गावरील डेंजर झोन ठिकाणी तातडीने उपाय योजना करावी” खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण पासून जवळ असलेल्या नडगिवे येथे डेंजर झोन ठरलेल्या अपघात प्रवण क्षेत्राला आज सोमवारी स. ११.३० वाजता महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खारेपाटण उप विभागीय…

सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिशांच्या विरोधातला आवाज शिवसैनिक बनला पाहिजे – वैभव नाईक

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा भव्य सत्कार कणकवली (प्रतिनिधी) : मी ठामपणे शिवसेना पक्षासोबत राहिलो आहे आणि यापुढेही राहणार आहे. मी कोणत्याही अपेक्षेने हे जिल्हाप्रमुख पद स्विकारलेले नाही. शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारली आहे. या…

सासोली येथे गवा रेड्याची चालत्या कारला जोरदार धडक; महिला गंभीर जखमी, कारचे मोठे नुकसान

दोडामार्ग (प्रतिनिधी) : सासोली येथील तिलारी कालव्या नजीक दोडामार्ग-बांदा मुख्य रस्त्यावर आज काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चालत्या अल्टो कारवर गवा रेड्याने अचानक धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघातात गाडीचे देखील हजारो…

सिंधुदुर्गनगरीत दर शनिवारी भरणार ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिस यांच्याहस्ते ९ मे रोजी उदघाटन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : ग्रामिण भागातील शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी आणि ग्राहकांना ताजा शेतमाल मिळावा या उद्देशाने सिंधुदुर्गनगरी पंचक्रोशी मधील लोकांच्या सोईसाठी दर शनिवारी ‘अस्सल गाठवठी आठवडा बाजार’ भरविण्यात येणार आहे. शनिवार दिनांक…

आंबा व काजू पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात यंदा कडाक्याची थंडी आणि अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजू या प्रमुख फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव सादर करावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

विवाहित शिक्षिका बेपत्ता

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील सोनाळी चव्हाणवाडी येथील जि.प शाळेत कार्यरत असलेल्या विवाहित शिक्षिका पुजा अनिल पोवार (वय ३४) ह्या १मे पासून बेपत्ता आहेत. त्यांचे पती अनिल यशवंत पोवार (रा. सिध्दनेर्ली, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार…

हळवल श्री शिवराई रवळनाथ मंदिराचा उद्या ५ मे रोजी वर्धापन दिन

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील हळवळ येथील ग्रामदेवता श्री शिवराई रवळनाथ मंदिराचा ११ वा वर्धापन दिन मंगळवार, ५ मे २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त भाविकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कार्यक्रमाची…