Konkan News

Konkan News

कणकवली नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक

कंत्राटदार कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचे बैठकीत झाले उघड कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर नगरपंचायत प्रशासन आणि कामगार संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसह काढून टाकण्यात आलेल्या सात सफाई कर्मचाऱ्यांना…

खारेपाटण ज्युनिअर कॉलेज येथे ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत महसूल नायब तहसीलदार, कणकवली एम बी मंडले यांच्याकडून शाळेची पाहणी; विविध बाबींची तपासणी

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत शाळा व महाविद्यालयां मध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाच्या अनुषंगाने सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी महसूल नायब तहसीलदार,…

शिरगाव-साटमवाडी आजीच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास करणारा डोंबिवलीत जेरबंद

सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि मानवी कौशल्याच्या आधारे सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई आरोपी देवगड पोलिसांच्या ताब्यात देवगड (प्रतिनिधी) : शिरगाव-साटमवाडी येथे वयस्कर महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख ७५ हजार रुपये किमतीची २५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक…

श्रावण मासानिमित्त प्रभाग क्रमांक १० मधील महिलांची भक्तिमय देवदर्शन सहल

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सहलीचा शुभारंभ; विविध धार्मिक स्थळांना भेट देत महिलांनी घेतला भक्तिमय आनंद कणकवली (प्रतिनिधी) : श्रावण मासाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक १० मधील महिलांसाठी एक दिवसीय देवदर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीचे नियोजन…

सिंधुदुर्गातील कुक्कुटपालन व्यवसायाला अधिक चालना देण्यासाठी शासनस्तरावर प्रभावी कार्यवाही

कुक्कुटपालन व्यावसायिकांना शासनाच्या योजना व सवलतींचा लाभमिळवून द्या- मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत कुक्कुटपालन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्यात आला आहे. कुक्कुटपालन व्यवसायिकांना शासनाच्या विविध योजना,…

चाकरमान्यांच्या आग्रहाला मान; ‘मोदी एक्स्प्रेस’च्या तारखेत बदल !

११ आणि १३ सप्टेंबरला दादरहून कोकणासाठी धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; मंत्री नितेश राणेंची माहिती भाजपच्या मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून तिकिटांचे बुकिंग कणकवली (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आग्रहाचा मान राखत पालकमंत्री नितेश राणे यांनी ‘मोदी एक्स्प्रेस’च्या प्रवासाच्या तारखेत बदल करण्याची…

कणकवली तालुक्यातील १३ हजार १६ नावे मतदार यादीतून वगळली

कणकवली तालुक्याची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध कणकवली (प्रतिनिधी) : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून…

अपघातमुक्तीसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या कमी करून अपघातमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. रस्ते, वाहतूक नियंत्रण तसेच रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

समुद्रात मासेमारी नौका बुडून दोघांचा मृत्यू

एकाला वाचवले : मालवण समुद्रातील घटना मालवण (प्रतिनिधी) : मालवण समुद्रात सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठिमागील खडकाळ परिसरात मासेमारीस गेलेली ‘सागरिका’ ही नौका लाटांच्या तडाक्यात मंगळवारी पहाटे बुडाली. नौकेतील तीन पैकी दोघे मच्छिमार यांचा बुडून मृत्यु झाला तर एक मच्छिमार सुदैवाने बचावला…

श्री.संजय आग्रे मित्रमंडळाच्या वतीने फोंडाघाट येथे ४ सप्टेंबरला भव्य जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा स्पर्धा

संजय आग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन जिल्ह्यातील महाविद्यालयीन खेळाडूंना चमकण्याची संधी कणकवली (प्रतिनिधी) : श्री. संजय आग्रे मित्र मंडळ, फोंडाघाट यांच्या वतीने आणि सिंधुदुर्ग जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने शिवसेना उपनेते मा. श्री. संजय आग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन मैदानी क्रीडा…