Konkan News

Konkan News

समस्या सोडविण्यासाठी जनता दरबार घेणार

सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, महामार्ग प्राधिकरण, महावितरण, एसटी यांसह विविध विभागांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जनता दरबार घेण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती हर्षदा वाळके व…

विद्यार्थ्यांचा पंतप्रधान मोदींशी थेट संवाद

२७ ऑगस्टला कणकवलीत विशेष कार्यक्रम ; राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘माय भारत’ आणि NSS चा संयुक्त उपक्रम सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दरवर्षी २७ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना एक सुवर्णसंधी मिळणार आहे. ‘माय भारत’ (MY Bharat) आणि…

खारेपाटण रामेश्वर नगर येथील स्नेहसखी महिला ग्रुपचा राज्यात डंका

ठाणे येथील राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत मिळविला प्रथम क्रमांक खारेपाटण (संतोष पाटणकर ) : विश्वास सामाजिक संस्था ठाणे व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर (जिल्हा ) यांच्यावतीने ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य स्तरीय मंगळागौर स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण रामेश्वरनगर या…

माजगाव येथे कुत्र्यांच्या तावडीतून सांबराच्या पिल्लाची सुरक्षित सुटका

तपासणीनंतर वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासात मुक्तता सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील माजगाव येथील दत्तमंदिर परिसरातील राजू भोगण यांच्या घरालगत कुत्र्यांनी पाठलाग करून अडवून ठेवलेल्या एका सांबराच्या पिल्लाला वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर सांबराचे हे पिल्लू सुखरूप असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला…

ट्रक क्लीनरचा चाकूने स्वतःच्या गळ्यावर पोटावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न

चौके साळेल परिसरातील चिरेखाणीनजीक घडली घटना गंभीर वार केल्याने क्लीनर युवकाची प्रकृती गंभीर चौके (प्रतिनिधी) : साळेल चौके परिसरात चिरेखाण व्यवसाय सुरू असलेल्या परिसरात कोल्हापूर गडहिंग्लज निलजी येथील चिरे भरण्यासाठी आलेल्या ट्रक वरील क्लीनर मानदेश निगोडा पाटील या युवकाने मंगळवार…

शिष्यवृत्ती परीक्षेत कणकवली विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांचे यश

कणकवली (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या प्रशालेच्या १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे : इयता चौथी-वेद नीलेश कडूलकर, यथार्थ राकेश काणेकर, पाचवी पार्थ…

वेंगुर्ले आगारातर्फे आजपासून ३० ऑगस्टपर्यंत जादा अक्कलकोट बस

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ले आगारातर्फे २५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत दररोज सकाळी ७.४५ वाजता वेंगुर्ले-अक्कलकोट ही जादा बस सोडण्यात येणार आहे. ही बस वेंगुर्ले बस स्टॅण्डवरून निघणार असून मठमार्गे कुडाळ, कणकवली, बावडामार्गे अक्कलकोट असा…

गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप; शिक्षणप्रवासाला मिळाली नवी दिशा

मालवण (प्रतिनिधी) : कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वराडकर हायस्कूल व कला वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत सायकल वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख श्री. किशोर पाटकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात…

राकेश परब यांचे कर्तृत्व प्रेरणादायी व अभिमानास्पद – जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

विविध सामाजिक उपक्रमांनी राकेश परब यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चुनवरे गावचे सुपुत्र आणि राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी हजारो…

सोलार हायमास्टमुळे कणकवली शहर होणार अधिक प्रकाशमान ; नगराध्यक्ष संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील नागरिकांना सुरक्षित, प्रकाशमान आणि सुविधायुक्त वातावरण मिळावे, हा नगरपंचायतीचा कायम प्रयत्न आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी सोलार हायमास्ट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना चांगल्या प्रकाशाची सुविधा मिळणार आहे. सौरऊर्जेवर…