Konkan News

Konkan News

सावंतवाडीत ‘भव्य तिरंगा यात्रा ‘ : पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर १० ऑगस्ट ते १७ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून आज सोमवारी सावंतवाडी शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने ‘भव्य तिरंगा यात्रा’ अत्यंत उत्साही…

जामसंडेत झाड कोसळून दोन घरांचे मोठे नुकसान

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे-वळकुवाडी येथील आनंद धुरी व उदय भडसाळे यांच्या घरावर तेथील आंब्याचे मोठे झाड कोसळून दोन्ही घरांचे मोठे नुकसान झाले. कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास जामसंडे…

अन्न व पाणी तपासणीसाठी सिंधुदुर्गात NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळा उभारा

जिल्हा व्यापारी संघाची पालकमंत्री ना . नितेश राणे यांच्याकडे मागणी देवगड (प्रतिनिधी) : अन्न व पाणी तपासणी अधिक प्रभावीपणे व्हावी, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात NABL मान्यताप्राप्त तपासणी प्रयोगशाळा उभारण्याबाबत पालकमंत्री तथा बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. नितेश राणे यांच्याशी व्यापारी…

नारायण राणेंच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर

वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात १० ऑगस्टला भाजपतर्फे आयोजन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजप तर्फे तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन…

जागतिक आदिवासी दिनानिमित्त कणकवलीत ‘उलगुलान मेळा’ उत्साहात

शिक्षण, आरोग्य आणि संस्कृतीच्या जतनाची सांगड घालणे काळाची गरज : तहसीलदार दीक्षांत देशपांडे कणकवली (प्रतिनिधी) : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षण, आरोग्य सुविधा आणि पारंपरिक संस्कृतीचे जतन या तिन्ही बाबींची सांगड घालणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन…

पंचगंगा एक्स्प्रेससह करवार-मडगाव एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे; वाढीव सुविधा सप्टेंबरपर्यंत कायम

कोकण (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांना जोडण्यात आलेल्या अतिरिक्त डब्यांची तात्पुरती वाढीव सुविधा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोकण रेल्वेने ३ ऑगस्ट…

वैभव नाईक यांच्याकडून डी. वाय. पाटील कुटुंबियांचे सांत्वन

कुडाळ (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनामुळे सर्वच क्षेत्रात शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव…

शिवडाव हायस्कूलच्या रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न लवकरच सुटणार

शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन १५ ऑगस्टपूर्वी शिक्षक न मिळाल्यास उपोषणाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव माध्यमिक विद्यालयातील रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात…

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिंधुदुर्गात विविध उपक्रम

९ ते १७ ऑगस्टदरम्यान अभियान : नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध…

आनंदवाडी-देवगड येथे ९ ऑगस्टपासून श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : आनंदवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता या सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. श्री विठ्ठल मंदिरात समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…