Konkan News

Konkan News

स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढत्या महागाईविरोधात शिवसेना आक्रमक

2 सप्टेंबरला करणार वैभववाडीत तीव्र जनआंदोलन! वैभववाडी (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीकडून सर्वसामान्य जनतेवर जबरदस्तीने लादण्यात येणारे वादग्रस्त ‘स्मार्ट मीटर्स’ आणि ऐन सणासुदीच्या काळात गगनाला भिडलेली महागाई याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या जनविरोधी धोरणांच्या विरोधात…

हळवल फाटा येथे आयशर टेम्पो पलटी

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो हळवल फाटा येथील तीव्र वळणावर पलटी झाला. या अपघातात टेम्पोच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक जखमी झाला आहे. या गाडीमध्ये दोन व्यक्ती असल्याचे बोलले जाते. घटनांची माहिती…

झाराप-पत्रादेवी बायपासवर वेत्ये येथे दोन दुचाकींच्या भीषण अपघातात गोव्यातील युवतीचा मृत्यू

तिघे जखमी, सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल सावंतवाडी (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपास मार्गावर वेत्ये खांबलवाडी येथील श्री संत गोरा कुंभार मंदिरालगत दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील एका युवतीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण जखमी झाले…

मोकाट जनावरे अचानक आडवी आल्याने दुचाकीचा अपघात

महिला सुदैवाने बचावल्या : कणकवलीत मोकाट जनावरांचा उपद्रव कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, नागरिकांच्या जीवितासह वाहनांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी सायंकाळी तेली आळी ते डीपी रोडदरम्यान मोकाट जनावरे अचानक दुचाकीसमोर आडवी…

श्रावण सोमवारनिमित्त संदेश पारकर यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वर मंदिरात प्रथम पूजा

कणकवली (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्री देव कुणकेश्वर मंदिरात कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांना प्रथम पूजेचा मान मिळाला. सोमवारी पहाटे संदेश पारकर यांनी मंदिरात उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे विधिवत पूजन केले. त्यानंतर आरती करण्यात आली. श्रावण सोमवारनिमित्त…

पुस्तके वाचणे ही जीवनातील एक इनवेस्टमेंट !

गोपुरीतील वाचन संस्कृती उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात वाचनप्रेमींचे मत कणकवली (प्रतिनिधी) : पुस्तके वाचणे ही जीवनातील एक इनवेस्टमेंट आहे. पुस्तके वाचल्याने माणसांच्या विचारांना गती प्राप्त होते. वाचनामुळे खरे व खोटे काय याची समज माणसाला येते. आधुनिक काळात लोप पावत चाललेली वाचन…

…आणि ओझरमात मोबाईल खणखणले!

तळेरे (स्वप्नील तांबे) : आज होयत… उद्या होयत… असा म्हणत म्हणत अखेर ओझरम गावात BSNL टॉवर सुरू झालो आणि नुसतो सुरू झालो नाय, तर गावकारण्यांच्या मोबाईलची रिंगटोन थेट खणखणक लागली! तेचा झाला असा की गेली अनेक महिने ओझरम गावात मोबाईल…

देवगडच्या पर्यटनाला नवी झळाळी! आकर्षक ‘सेल्फी म्युझियम’चे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

देवगड (प्रतिनिधी) : देवगडच्या पर्यटनाला नवी ओळख देणाऱ्या आकर्षक आणि अभिनव ‘सेल्फी म्युझियम’चा शुभारंभ आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. देवगडमधील उद्योजक श्रीकांत जाईल यांच्या संकल्पनेतून हे अनोखे सेल्फी पॉईंट साकारण्यात आले आहे. पर्यटकांना देवगडमध्ये नवा अनुभव…

वागदेत स्थानिक बियाणे बँकेचा शुभारंभ

शाश्वत शेतीसाठी अभिनव उपक्रम पारंपरिक बियाण्यांच्या संवर्धनावर भर कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुक्ताई संकुल, वागदे येथे मुक्ताई शेती संशोधन व विकास गटाच्या माध्यमातून स्थानिक बियाणे बँक या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. स्थानिक व पारंपरिक बियाण्यांचे जतन, संवर्धन व…

चाफेड गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सत्यवान भोगले

ग्रामसभेत एकमताने बिनविरोध निवड; सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा शिरगांव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील चाफेड गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सत्यवान सूर्यकांत भोगले यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी दोन वेळा अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी गावातील अनेक तंटे गावपातळीवर मिटवून…