Category कोकण

नियमित कर्जफेड करणाऱ्या आंबा-काजू शेतकऱ्यांना जिल्हा बँक २% व्याज सवलत देणार : मनिष दळवी

सिंधूदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सन २०२६ पिंक हंगामामध्ये जिल्ह्यातील अवकाळी पाऊस दाटधुके आणि खार/दवा इ. हवामानीय बदलामुळे यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बँक असून नेहमी शेतकऱ्यांसोबत राहिलेली आहे. शेतकऱ्यांचे हित…

पिसेकामते येथील राहत्या घराला आग ; सिलेंडर चा स्फोट

६ लाख २३ हजार ४०० रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान ; सुदैवाने जीवितहानी टळली कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिसेकामते – गावठणवाडी येथे मंगळवारी सुनील कृष्णा गुरव यांच्या राहत्या घराला सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. घराला लागलेल्या आगीतच घरातील घरगुती वापराच्या…

एक महिला, दुसऱ्या स्त्रीची सखी बनावी. तरच आजचा समाज महिलांचा आदर करेल-संजना आग्रे

महिलांच्या कार्याचा सत्कार आणि त्यातून प्रेरणा-यासाठी हा गौरव दिवस !- तन्वी मोदी फोंडा ग्रामपंचायत आयोजित जागतिक महिला दिनासाठी महिलांची अभूतपूर्व उपस्थिती ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : महिलांच्या हक्कासाठी, आंतरराष्ट्रीय महिला चळवळीने १९७७ साली अधिकृत मान्यता दिली. आणि ८ मार्च हा दिवस…

जागतिक महिला दिनी ओसरगावार रंगली पाककला आणि खेळ पैठणीची स्पर्धा

सरपंच सुप्रिया संतोष कदम यांची संकल्पना, आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव सरपंच श्रीमती सुप्रिया संतोष कदम यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून जागतिक महिला दिनानिमित्त शाळा ओसरगाव-कानसळीच्या भव्य पटांगणावर ‘खेळ पैठणीचा’ व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित जि.प.…

कणकवलीत संताजी जगनाडे चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

युवा तेली समाज मंडळ, सिंधुदुर्गचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : युवा तेली समाज मंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘संताजी जगनाडे चषक 2026’ भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. 21 मार्च ते रविवार दि. 22…

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृतीसाठी सावंतवाडीत बाईक रॅली

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत अभय केंद्र सावंतवाडी यांच्या वतीने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या उपक्रमाअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरात बाईक रॅली काढून नागरिकांमध्ये मुलींच्या शिक्षण व संरक्षणाबाबत जागृती करण्यात आली. या रॅलीचा…

वेंगुर्ले ओंकारेश्वर दत्त मंदिरात १२ रोजी गणेशयाग

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : बाजारपेठ नजीकच्या कैवल्यस्वामी ओंकारेश्वर दत्त मंदिर येथे गुरुवार, १२ मार्च रोजी सकाळी ११ वा. पुणे अग्निहोत्र मंडळातर्फे गणेशयाग आयोजित केला आहे. दिवसभर अग्निहोत्र प्रचार, सायंकाळी ६.४२ वा. अग्निहोत्र प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९४२३८३२८४८ येथे संपर्क साधावा.

तुळसमध्ये गव्या रेड्यांच्या झुंजीची वाहनांना धडक, ४ जण जखमी; ओमनी रिक्षेचे नुकसान

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तुळस येथील शिवाजी हायस्कूलजवळ सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास गव्या रेड्यांच्या झुंजीमुळे थरारक अपघात घडला. दोन गव्यांमध्ये सुरू झालेल्या भीषण झुंजीदरम्यान एक गवा भरधाव वेगात धावत येत समोर उभ्या असलेल्या ओमनी व रिक्षेला धडकला. यामुळे ४ जण…

‘घे भरारी’च्या महिलांचा दणदणीत दशावतार नाट्यप्रयोग

सावंतवाडी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘घे भरारी’ फाउंडेशन सावंतवाडी यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे केले होते. यात फाउंडेशनच्या महिलांनी सादर केलेला दशावतार नाटकाचा दणदणीत प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. स्थानिक महिलांनी साकारलेल्या भुमिकांना…

सावंतवाडीत १३ मार्चला ‘नारी अभ्युदय महोत्सव’

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या ‘वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस’ या संस्थेच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ‘नारी अभ्युदय महोत्सव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “सक्षम स्त्री, सक्षम…