Category कोकण

स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणे गरजेचे – संदेश पारकर

सामाजिक, संस्कृतीक कार्यक्रमांमुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळते वेंगुर्ला (प्रतिनिधी) : स्पर्धेच्या युगात प्रत्येकाने आव्हानांना सामोरे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे आवश्यक असल्याचे आहे. अशा उपक्रमांमुळे सांस्कृतिक चळवळीला बळ मिळत असून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे, असे प्रतिपादन कणकवली नगराध्यक्ष…

करूळ घाटात टँकर पलटी…. घाटरस्ता वाहतुकीस बंद…. भुईबावडा घाटातून वाहतूक वाळविली….

वैभववाडी (प्रतिनिधी) : अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे करुळ घाटात डिझेल व पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलीस व…

कार्यकर्त्यांच्या बळावर लाचारी आणि दबाव झुगारण्याची ताकद मला मिळूदे, हेच माझे देवाकडे गाऱ्हाणे – वैभव नाईक

विविध सामाजिक उपक्रमांनी कुडाळात मा. आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा कणकवली (प्रतिनिधी) : कार्यकर्त्यांच्या प्रेमातून मला ऊर्जा मिळत असून आज माझा पराभव झाला असला, तरी याच उर्जेने मी पुढे काम करत राहणार आहे. सत्ता नसली तरी अनेक लोक…

जि. प. महिला बालकल्याण सभापतीपदी अनुराधा नारकर तर शिक्षण आरोग्य सभापतीपदी प्रितेश राऊळ

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली घोषणा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : भाजपकडून विषय समिती सभापती पदासाठी उमेदवारांची घोषणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली आहे. त्यानुसार वेंगुर्ले तालुक्यातील रेडी जिल्हा परिषद मधून निवडून आलेले प्रितेश राऊळ यांची शिक्षण व आरोग्य समिती सभापती…

मेगा मेडिकल स्पेशालिटी शिबिरातून ९४७ रुग्णांना दिलासा

सुपर स्पेशालिस्ट सेवांचा दुर्गम सिंधुदुर्गमध्ये लाभ; ९ शस्त्रक्रिया यशस्वी दर ३ महिन्यांनी होणार मेगा मेडिकल स्पेशलिटी तपासणी शिबिर सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मेगा मेडिकल स्पेशालिटी तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त…

माजी आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ६२…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला इंधन पुरवठ्याचा आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पर्यटन हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलची मागणीही लक्षणीय वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी इंधनसाठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश सर्व इंधन कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील पेट्रोल पंप इंधनाविना राहणार नाही,…

आ. दीपक केसरकरांमुळे सावंतवाडीची बदनामी

खरात प्रकरणी राजीनाम्याची मागणी ठाकरे शिवसेनेचा मोर्चा सावंतवाडी (प्रतिनिधी) : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सावंतवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मोर्चा काढत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिले. केसरकर यांच्यामुळे सावंतवाडीची बदनामी झाल्याचा आरोप करत…

तळेरे प्रभाग स्तरीय मुख्याध्यापक सभेत विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर यांचा निरोप समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पीएमश्री प्रभाग शाळा तळेरे नं. १ येथे नुकतीच तळेरे प्रभाग स्तरीय मुख्याध्यापक सहविचार सभा उत्साहात पार पडली. या सभेचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त करण्यात आलेला भव्य सत्कार आणि प्रभागातील उत्कृष्ट…

वसुंधरा 5.0 अभियानात राज्यस्तरीय यशामध्ये सौंदळे ग्रामपंचायतची झेप

25 लाखांचा पुरस्कार पटकावून सौंदाळे ग्रामपंचायतीने घेतली उंच भरारी देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मार्फत 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या “माझी वसुंधरा अभियान 5.0” अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल…