Konkan News

Konkan News

शिवसेच्या वर्धापनदिनी उपरकरांनी घेतली ठाकरेंची भेट

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्तमाजी आमदार, परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, गुरुनाथ खोत उपस्थित होते

सिंधुदुर्गातील २७ हजार ८०६ बालकांना देणार पोलिओ डोस: जिल्हाभरात ९०४ लसीकरण केंद्रे

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ रोजी सिधुदुर्गनगरी (प्रतिनिध) : जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार २८ जून रोजी उत्साहात राबविण्यात येणार असून, ० ते ५ वर्षे वयोगटातील २७ हजार ८०६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात…

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त पडेल मंडलात विविध सामाजिक व विकासकामांचे भरगच्च आयोजन !

पडेल (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री ना. श्री. नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक २३ जून २०२६ रोजी पडेल मंडळामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांच्या धडाकेबाज कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण पडेल मंडळात हा वाढदिवस अत्यंत…

नांदगाव पाटीलवाडी दत्त मंदिरासमोर दोन कारची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव येथील पाटीलवाडी, दत्त मंदिरासमोर आज दोन कारमध्ये जोरदार अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातानंतर…

सिंधुदुर्गात जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने ‘GPR’ कार्यशाळा संपन्न, दाखले मिळणे होणार अधिक जलद !

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, जलद, पारदर्शक आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आपले सरकार सेवा केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून प्रशासन आणि केंद्र चालक यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे सेवा वितरणाची गुणवत्ता अधिक उंचावेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

बांदा : विलवडेत गोवा बनावटीच्या दारुसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई बांदा (प्रतिनिधी) : बांदा-दाणोली रस्त्यावरील विलवडे गावच्या चर्चसमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने गुरुवारी बेकायदा दारू वाहतूक विरोधात कारवाई केली. स्विफ्ट डिझायर कारसह एकूण ८ लाख ५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…

गोवा बनावटीच्या ४८ लाखांच्या दारूसह २० लाखांचा आयशर टेम्पो जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : गोव्याहून राजस्थानच्या दिशेने अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली सुमारे ४८ लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि २० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो कणकवली पोलिसांनी जप्त केला. खारेपाटण चेकपोस्टवर १९ जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही…

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला म.न.पा. कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा- श्री अशोक जाधव

मागण्या न मानल्यास महापालिका कर्मचारीही उतरणार आंदोलनात : संघर्ष समितीचा इशारा खारेपाटण (संतोष पाटणकर) : बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी आज पुकारलेल्या असहकार आंदोलनाला म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य न…

‘जलसिंधू’मुळे जलसंपदा कर्मचाऱ्यांना मिळणार आधुनिक निवासाची सुविधा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन; दीड वर्षात दर्जेदार निवासी संकुल उभारण्याचे निर्देश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ या निवासी संकुलाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे…

स्वतःच्या अधिकारात नसतानाही जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मायनींगच्या ड्रोन सर्व्हेला परवानगीचे पत्र

जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाच्या ड्रोन सर्व्हेला परवानगी देण्याचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला कोणताही अधिकार नसतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याबाबतच्या परवानगीचे पत्र जेएसडब्ल्यू कंपनीला १२ जून २०२६ रोजी…