Konkan News

Konkan News

नांदगाव पाटीलवाडी दत्त मंदिरासमोर दोन कारची जोरदार धडक; सुदैवाने जीवितहानी टळली

नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव येथील पाटीलवाडी, दत्त मंदिरासमोर आज दोन कारमध्ये जोरदार अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. धडकेचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातानंतर…

सिंधुदुर्गात जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने ‘GPR’ कार्यशाळा संपन्न, दाखले मिळणे होणार अधिक जलद !

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, जलद, पारदर्शक आणि प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आपले सरकार सेवा केंद्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून प्रशासन आणि केंद्र चालक यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे सेवा वितरणाची गुणवत्ता अधिक उंचावेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

बांदा : विलवडेत गोवा बनावटीच्या दारुसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई बांदा (प्रतिनिधी) : बांदा-दाणोली रस्त्यावरील विलवडे गावच्या चर्चसमोर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने गुरुवारी बेकायदा दारू वाहतूक विरोधात कारवाई केली. स्विफ्ट डिझायर कारसह एकूण ८ लाख ५ हजार ४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त…

गोवा बनावटीच्या ४८ लाखांच्या दारूसह २० लाखांचा आयशर टेम्पो जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : गोव्याहून राजस्थानच्या दिशेने अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली सुमारे ४८ लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि २० लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो कणकवली पोलिसांनी जप्त केला. खारेपाटण चेकपोस्टवर १९ जून रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही…

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला म.न.पा. कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा- श्री अशोक जाधव

मागण्या न मानल्यास महापालिका कर्मचारीही उतरणार आंदोलनात : संघर्ष समितीचा इशारा खारेपाटण (संतोष पाटणकर) : बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी आज पुकारलेल्या असहकार आंदोलनाला म.न.पा. कामगार संघटना संघर्ष समितीने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य न…

‘जलसिंधू’मुळे जलसंपदा कर्मचाऱ्यांना मिळणार आधुनिक निवासाची सुविधा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन; दीड वर्षात दर्जेदार निवासी संकुल उभारण्याचे निर्देश सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ या निवासी संकुलाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे…

स्वतःच्या अधिकारात नसतानाही जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मायनींगच्या ड्रोन सर्व्हेला परवानगीचे पत्र

जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जेएसडब्ल्यू मायनिंग प्रकल्पाच्या ड्रोन सर्व्हेला परवानगी देण्याचा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला कोणताही अधिकार नसतानाही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्याबाबतच्या परवानगीचे पत्र जेएसडब्ल्यू कंपनीला १२ जून २०२६ रोजी…

निम्मेवाडी-चव्हाटा मंदिर पायवाटीच्या चिरेबंदी कामाचे भूमिपूजन

नगरसेवक राकेश राणे यांच्याहस्ते झाले भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील निम्मेवाडी ते चव्हाटा मंदिर या परिसरातील पायवाट गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. देवतरंग देवस्थळी ये-जा करणाऱ्या भाविकांना मार्गाच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पायवाटीच्या कामाची ग्रामस्थांची अनेक…

एसआयटी कडून सिंधुदुर्गातील २४५ शिक्षकांची तपासणी सुरू

शिक्षण समिती सभेत धक्कादायक बाब उघड ओरोस (प्रतिनिधी) : विशेष तपासणी पथकाद्वारे (एसआयटी) जिल्ह्यातील २४५ शिक्षकांची तपासणी सुरू आहे. शिक्षण विभागाकडून एवढ्या शिक्षकांची कागदपत्रे एसआयटीने मागवून घेतली असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत उघड झाली आहे. ही चौकशी…

सिंधुदुर्गसाठी मोठी बातमी : खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून ४७कोटींपेक्षा अधिक निधीचे १२ पूल मंजूर !

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते आणि दळणवळण व्यवस्थेला मोठा वेग मिळणार आहे. ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-भाग ३’ (PMGSY-III) अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी एकूण ४७ कोटी ३६ लाख ६४ हजार रुपये निधीच्या…