Konkan News

Konkan News

पालकमंत्र्यांनी गुढीपाडव्याला पक्षप्रवेश करून ठाकरे सेनेला दिला सिंधुदुर्गात दणका

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ऐन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात भाजपाची पक्षप्रवेशाची गुढी उभारली असून जिल्ह्यात ठाकरे सेनेला दणका दिला आहे. देवगड तालुक्यातील पडेल भाजपा मंडल मधील वाडा गावातील ठाकरे सेनेच्या शिवसैनिकांनी पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते गुढीपाडव्यादिवशी ओरोस…

दुचाकी वरील नियंत्रण सुटून जानवली येथे अपघात; एक ठार तर एक जखमी

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली हुन विजयदुर्ग च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला आदळल्याने अपघात झाला. या अपघातात अनिल सिंग गौंड (वय 30 वर्ष मूळ रा. ग्राम जमूनिया, रामघर, जि. दमोह राज्य मध्यप्रदेश…

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘१०८’ रुग्णवाहिकेतच कन्यारत्नाचा जन्म

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : हिंदू नववर्षाच्या प्रारंभाचा सण गुढीपाडवा साजरा होत असतानाच वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी येथे आनंदाची दुहेरी बातमी समोर आली. ‘१०८’ रुग्णवाहिकेतच एका महिलेची सुखरूप प्रसूती होत गोंडस कन्यारत्नाचा जन्म झाला. आज सकाळी ८:२२ वाजता ‘१०८’ नियंत्रण कक्षाला वायंगणी येथून…

महिला दिनानिमित्त कुपवडे जि.प. शाळेत पाककला स्पर्धा व फनी गेम्स

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील कुपवडे जिल्हा परिषद प्राथमिक पूर्ण शाळा क्रमांक १ येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा व फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. पाककला स्पर्धेत महिलांनी उत्साहाने…

तनुष धोंडू चिंदरकर गुरुकुल प्रज्ञा शोध परीक्षेत महाराष्ट्रात द्वितीय

आचरा (प्रतिनिधी) : गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर आयोजित प्रज्ञाशोध परीक्षा (G.T. S) 2025-26 चिंदर गावचा सुपुत्र तनुश धोंडू चिंदरकर याने दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर भटवाडी येथे इयत्ता पहिली मध्ये शिक्षण घेत असलेल्या तनुश याने…

सिंधुदुर्ग जि.प. विषय समिती सभापती निवडणूक २५ रोजी

सिधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आता विषय समिती सभापती पदाची निवडणूक २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि विद्यमान पंचायत समिती सभापती यांच्या उपस्थितीत समाज कल्याण समिती १ पद,…

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : तिनही नराधमावर कठोर कारवाई करा

वैभववाडी (प्रतिनिधी) : अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिचे व्हिडिओ काढणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा, या मागणीचे निवेदन नेर्ले ग्रामस्थांनी तहसीलदार सूर्यकांत पाटील व पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना दिले आहे. नेर्ले येथील मयूर मनोहर सुर्वे, ओंकार पंढरीनाथ सुर्वे तसेच…

वैभववाडीत कृषी महोत्सव; शेतकऱ्यांनी विविध पिकांमधून आर्थिक प्रगती साधावी – सिद्धेश रावराणे

वैभववाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकरी आंबा काजू पिकांबरोबरच ऊस, भात, कलिंगड, हळद, भाजीपाला इत्यादी पिके घेत आहेत. हे सर्व अभिमानास्पद असून या शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेऊन आर्थिक प्रगती साधावी. त्याचप्रमाणे तालुक्यातील महिला बचत गटांचे काम ही अत्यंत चांगले असून त्यांनी उत्पादित…

मनस्वी ठाणेकरांनी मांडला मंत्री नितेश राणेंच्या अभिनंदनाचा ठराव

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर करून राज्यातच नव्हे तर देशातही एक नवा आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक पारदर्शक, जलद आणि कार्यक्षम होण्यास मोठी मदत होत आहे. त्यामुळेच कणकवली…

सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा आता दररोज

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून होणारी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा आता आठवड्याचे सातही दिवस सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानसेवेसाठी १०० टक्के ‘व्हायबिलिटी गॅप फंडिंग’ (VGF) देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री…