Konkan News

Konkan News

आ. दीपक केसरकरांमुळे सावंतवाडीची बदनामी

खरात प्रकरणी राजीनाम्याची मागणी ठाकरे शिवसेनेचा मोर्चा सावंतवाडी (प्रतिनिधी) : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सावंतवाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने मोर्चा काढत प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन दिले. केसरकर यांच्यामुळे सावंतवाडीची बदनामी झाल्याचा आरोप करत…

तळेरे प्रभाग स्तरीय मुख्याध्यापक सभेत विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर यांचा निरोप समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : पीएमश्री प्रभाग शाळा तळेरे नं. १ येथे नुकतीच तळेरे प्रभाग स्तरीय मुख्याध्यापक सहविचार सभा उत्साहात पार पडली. या सभेचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त करण्यात आलेला भव्य सत्कार आणि प्रभागातील उत्कृष्ट…

वसुंधरा 5.0 अभियानात राज्यस्तरीय यशामध्ये सौंदळे ग्रामपंचायतची झेप

25 लाखांचा पुरस्कार पटकावून सौंदाळे ग्रामपंचायतीने घेतली उंच भरारी देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मार्फत 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या “माझी वसुंधरा अभियान 5.0” अंतर्गत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई

जिल्हा प्रशासन, ऑईल कंपन्यांमध्ये ताळमेळ नाही कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हा प्रशासन व ऑईल कंपनीचे अधिकारी यांच्यामध्ये ताळमेळ नसल्याने सिंधुदुर्गातील पेट्रोल पंपावर पेटोल व डिझेलची टंचाई भासू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या टंचाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप…

हरकुळ खुर्द येथील पितृछत्र व मातृछत्र हरपलेल्या खानविलकर भावंडांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती’चा मदतीचा हात

खारेपाटण (प्रतिनिधी) : हरकुळ खुर्द (खालची तेलीवाडी) येथील आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या चार अनाथ भावंडांच्या मदतीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती धावून आली आहे. या घटनेची दखल घेत शिक्षक समितीच्या कणकवली शाखेच्या वतीने या कुटुंबाला ३०,०००/- रुपयांची आर्थिक मदत नुकतीच सुपूर्द…

पीएमसी योजनेअंतर्गत केंद्र शाळा शिरगाव नं. १ येथे ‘राखणदार’ हा पर्यावरण जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : पीएमसी योजनेअंतर्गत पीएमसी केंद्र शाळा शिरगाव नंबर एक येथे पर्यावरण जनजागृती कार्यक्रमांतर्गत ‘राखणदार’ हा निसर्ग प्रबोधन आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनुभव शिक्षा केंद्र सिंधुदुर्ग आणि राष्ट्रसेवा दल सिंधुदुर्ग यांच्या सहयोगाने तसेच कोकणी रानमाणूस प्रसाद…

दाजीपूर अभयारण्य सफारी 7 एप्रिल पर्यंत बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील गवा रेड्यांचे अधिवास असलेल्या सुप्रसिद्ध दाजीपूर अभयारण्य सफारी 7 एप्रिल 2026 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश वनविभागाकडून काढण्यात आले आहेत. दाजीपूर अभयारण्यामध्ये असलेला पर्यटन सफारी रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्ता दुरुस्ती कामामुळे 25…

मा.आ. वैभव नाईक यांच्या  वाढदिवसानिमित्त मांडकुली शिवसेना शाखेच्या वतीने  तिरंगी डबलबारी उत्साहात संपन्न

वैभव नाईक यांचा सत्कार करत केक कापून वाढदिवस केला साजरा कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या  वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मांडकुली शाखेच्या वतीने शनिवारी मांडकुली येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित…

मा.आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबीर

कणकवली (प्रतिनिधी) : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या मंगळवार दि. २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे रक्तदान शिबीर घेण्यात…

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत ; केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी…