Konkan News

Konkan News

वैभव नाईक यांच्याकडून डी. वाय. पाटील कुटुंबियांचे सांत्वन

कुडाळ (प्रतिनिधी) : ज्येष्ठ शिक्षणमहर्षी, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या दुःखद निधनामुळे सर्वच क्षेत्रात शोककळा पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव…

शिवडाव हायस्कूलच्या रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न लवकरच सुटणार

शिक्षणाधिकाऱ्यांकडून शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन १५ ऑगस्टपूर्वी शिक्षक न मिळाल्यास उपोषणाचा इशारा कणकवली (प्रतिनिधी) : शिवडाव माध्यमिक विद्यालयातील रिक्त शिक्षक पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात…

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिंधुदुर्गात विविध उपक्रम

९ ते १७ ऑगस्टदरम्यान अभियान : नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध…

आनंदवाडी-देवगड येथे ९ ऑगस्टपासून श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : आनंदवाडी येथील श्री विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही श्री हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता या सप्ताहाला प्रारंभ होणार आहे. श्री विठ्ठल मंदिरात समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

कट्टा महाविद्यालयात “करिअर कट्टा” चा इंडक्शन अवेअरनेस प्रोग्राम संपन्न

मालवण (प्रतिनिधी) : कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ विभागाअंतर्गत ‘इंडक्शन अवेअरनेस…

वेंगुर्ल्यात १४ रोजी देशभक्तीपर समूहगायन स्पर्धा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शिस्त, सांधिकता, सांस्कृतिक मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस व विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले तालुकास्तरीय शालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

खारेपाटण पंचशील नगर येथील अंगणवाडीत स्तनपान सप्ताह साजरा

“नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या सर्वांची जबाबदारी” – सौ प्राची ईसवलकर खारेपाटण (संतोष पाटणकर) : ” आईचे दूध हे बाळासाठी अमृत असून स्तनदा माता व नवजात बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे भावपूर्ण उदगार जिल्हा परिषद…

एलपीजी ग्राहकांनी १६ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी करावी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी (गॅस) ग्राहकांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया १६ ऑगस्टपूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. सर्व एलपीजी ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅसवितरकाशी संपर्क साधून अथवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या अधिकृत मोबाईल अॅपद्वारे ई-केवायसी…

कासार्डे येथे उद्या ‘रानभाज्या व गावठी बाजार’ महोत्सव; विद्यार्थ्यांच्या उद्योजकतेला मिळणार व्यासपीठ

कासार्डे (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘कासार्डे केंद्रस्तरीय रानभाज्या व गावठी बाजार महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत कासार्डे तिठा येथे संपन्न होणार असून, केंद्रातील विविध शाळांतील…

तळेरेत कल्याण मटका अड्यावर पोलिसांची कारवाई

४२ हजारांचा मुद्देमाल जप्त कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळेरे एसटी स्थानक परिसरातील कल्याण मटका जुगार अड्डयावर कणकवली पोलिसांनी धाड टाकून विनय विश्वनाथ महाडीक (वय ३७, रा. तळेरे बाजारपेठ) याच्यावर कारवाई केली. या कारवाईत ४२ हजार १३० रुपयांचा रोख रक्कमेसह मोबाईल…