Konkan News

Konkan News

मोकाट जनावरे अचानक आडवी आल्याने दुचाकीचा अपघात

महिला सुदैवाने बचावल्या : कणकवलीत मोकाट जनावरांचा उपद्रव कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, नागरिकांच्या जीवितासह वाहनांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी सायंकाळी तेली आळी ते डीपी रोडदरम्यान मोकाट जनावरे अचानक दुचाकीसमोर आडवी…

श्रावण सोमवारनिमित्त संदेश पारकर यांच्या हस्ते श्री देव कुणकेश्वर मंदिरात प्रथम पूजा

कणकवली (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी श्री देव कुणकेश्वर मंदिरात कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांना प्रथम पूजेचा मान मिळाला. सोमवारी पहाटे संदेश पारकर यांनी मंदिरात उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे विधिवत पूजन केले. त्यानंतर आरती करण्यात आली. श्रावण सोमवारनिमित्त…

पुस्तके वाचणे ही जीवनातील एक इनवेस्टमेंट !

गोपुरीतील वाचन संस्कृती उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात वाचनप्रेमींचे मत कणकवली (प्रतिनिधी) : पुस्तके वाचणे ही जीवनातील एक इनवेस्टमेंट आहे. पुस्तके वाचल्याने माणसांच्या विचारांना गती प्राप्त होते. वाचनामुळे खरे व खोटे काय याची समज माणसाला येते. आधुनिक काळात लोप पावत चाललेली वाचन…

…आणि ओझरमात मोबाईल खणखणले!

तळेरे (स्वप्नील तांबे) : आज होयत… उद्या होयत… असा म्हणत म्हणत अखेर ओझरम गावात BSNL टॉवर सुरू झालो आणि नुसतो सुरू झालो नाय, तर गावकारण्यांच्या मोबाईलची रिंगटोन थेट खणखणक लागली! तेचा झाला असा की गेली अनेक महिने ओझरम गावात मोबाईल…

देवगडच्या पर्यटनाला नवी झळाळी! आकर्षक ‘सेल्फी म्युझियम’चे पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

देवगड (प्रतिनिधी) : देवगडच्या पर्यटनाला नवी ओळख देणाऱ्या आकर्षक आणि अभिनव ‘सेल्फी म्युझियम’चा शुभारंभ आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. देवगडमधील उद्योजक श्रीकांत जाईल यांच्या संकल्पनेतून हे अनोखे सेल्फी पॉईंट साकारण्यात आले आहे. पर्यटकांना देवगडमध्ये नवा अनुभव…

वागदेत स्थानिक बियाणे बँकेचा शुभारंभ

शाश्वत शेतीसाठी अभिनव उपक्रम पारंपरिक बियाण्यांच्या संवर्धनावर भर कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील मुक्ताई संकुल, वागदे येथे मुक्ताई शेती संशोधन व विकास गटाच्या माध्यमातून स्थानिक बियाणे बँक या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. स्थानिक व पारंपरिक बियाण्यांचे जतन, संवर्धन व…

चाफेड गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सत्यवान भोगले

ग्रामसभेत एकमताने बिनविरोध निवड; सलग तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची धुरा शिरगांव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील चाफेड गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सत्यवान सूर्यकांत भोगले यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी दोन वेळा अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी गावातील अनेक तंटे गावपातळीवर मिटवून…

हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठात १०१ स्वामी भक्तांचा सामूहिक महाअभिषेक सोहळा उत्साहात

हडपिड (प्रतिनिधी) : श्रावण महिन्यातील पवित्र गुरुवारनिमित्त हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठात १०१ स्वामी भक्तांच्या उपस्थितीत सामूहिक महाअभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला स्वामी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर विधिवत…

२ कोटी ३७ लाखांच्या अंबरग्रीससह चौघे ताब्यात

एलसीबीची कुडाळ तालुक्यात मोठी कारवाई; वाहनांसह २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीपासून (अंबरग्रीस) तयार होणाऱ्या पदार्थाची तस्करी करण्याच्या उद्देशाने तो विक्रीसाठी घेऊन आलेल्या चौघांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी पणदूर-कडावल…

कणकवलीतील संगीत मैफिलीत रसिक मंत्रमुग्ध

श्री जगन्नाथ संगीत विद्यालयातर्फे गुरुपूजन सोहळा, सर्वांगसुंदर पखवाज वादनाने रंगत कणकवली (प्रतिनिधी) : श्री जगश्री जगन्नाथ संगीत विद्यालयातर्फे गुरुपूजन सोहळा, सर्वांगसुंदर पखवाज वादनाने रंगतथ संगीत विद्यालय, कणकवली शाखेच्या वतीने पखवाज अलंकार गुरुवर्य महेश विठ्ठल सावंत तसेच जयश्री मसुरकर यांचा संगीत…