Konkan News

Konkan News

हरकुळ बुद्रुक-कसालकरवाडीतील रस्त्याची दुरवस्था

कणकवली(प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक येथील कसालकरवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, टू-व्हिलर व रिक्षाचालकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडाझुडपांमुळे मार्ग आणखी अरुंद झाला असून, रात्री अपुऱ्या पथदिव्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.…

गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी

मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या प्रवास आता सुसाट होणार आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघ्या काही दिवसांचाच अवंधी राहिला असतानाच गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांना यंदाही टोलमधून सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुसार ११ सप्टेंबर ते २७…

कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाची कार्यवाही विद्यार्थी, पालक स्थानिक ग्रामस्थांकडून मानले आभार कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील गणपती साना ते जाणवली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे पडलेले मोठमोठे खड्डे अखेर बुजविण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत सार्वजनिक…

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कणकवली व स्थानिक स्थानकावरून एसटीच्या वाड्या वाड्यावर जाणाऱ्या लोकल फेऱ्या बंद ! चाकरमानी प्रवाशांचे संताप !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : एकीकडे प्रवाशांच्या सुख सोयीसाठी मुंबई आणि इतर राज्यातून गणेशोत्सवासाठी, कोकणाकडे असंख्य ST गाड्या/ रेल्वे आणि इतर वाहने याकडून येणारा कोकणवासीयांचा लोंढा ! या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्थानकावरून वाड्या- वाड्यावर जाणाऱ्या नेहमीच्या लोकल ST हे चाकरमान्यांचे एकमेव साधन आहे.…

खारेपाटण प्रा.आ.केंद्रात शॉर्ट सर्किट झाल्याने लागली आग

विद्युत उपकरणे जाळून झाली खाक खारेपाटण (संतोष पाटणकर ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागल्याने रुग्णालयाच्या आतील अनेक उपकरणे जाळून खाक झाली.मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान सुदैवाने या आगीत कोणतीही…

स्कूल बॅग पॉलिसी अंमलबजावणीच्या सूचना

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व कृतीप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ची सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या…

चतुर्थीपूर्वी शेवरे, ओंबळमध्ये BSNLचे 4G टॉवर कार्यान्वित

पालकमंत्री नितेश राणे यांनी केला शब्द खरा; नाद, शेवरे, ओंबळ, महाळुंगे परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा लाभ देवगड (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले शेवरे आणि ओंबळ येथील BSNLचे 4G टॉवर आजपासून कार्यान्वित झाले आहेत. गणेश चतुर्थीपूर्वी दोन्ही टॉवर सुरू…

कणकवली, सावंतवाडी मधील बंद सिटीस्कॅन सुविधा तात्काळ सुरू करा

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथील मोफत सिटीस्कॅन सुविधा बंद करण्यात आली आहे. संबंधित कंपनीला शासनाकडून देयक न मिळाल्याने बंद झालेली ही सिटीस्कॅन सुविधा लवकरात…

कणकवलीत गणेशोत्सवासाठी नगरपंचायतीचे व्यापक वाहतूक नियोजन

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे सहकार्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रहदारी सुरळीत ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने अत्यंत व्यापक पातळीवर नियोजन सुरू केले आहे. शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण…

नांदगाव पंचक्रोशीत माकड पकड मोहीम राबवा

असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांची वनविभागाकडे मागणी; माकडांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त कणकवली (प्रतिनिधी): नांदगाव पंचक्रोशीतील असलदे, नांदगाव, आयनल, कोळोशी, तोंडवली, बावशी तसेच परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माकडांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक व शेतकरी…