Konkan News

Konkan News

नाधवडेतील श्री ठाणेश्वर मंदिराचा उद्या भूमिपूजन सोहळा

वैभववाडी(प्रतिनिधी) : नाधवडे गावातील पावन भूमीवर वसलेल्या प्राचीन व जागृत श्री ठाणेश्वर देवस्थान, या मंदिराचा भुमिपुजन सोहळा उद्या २८फेब्रु. होत आहे. या निमित्ताने पवित्र भूमिपूजन विधीचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सकाळी ठीक ९.०० वाजता देवस्थान परिसरात…

‘धनंजय फाउंडेशन’च्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील धनंजय फाउंडेशनच्यावतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. धनंजय फाउंडेशनच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती परीक्षा…

‘इको सेन्सिटिव्ह झोन’ २५ गावांसाठी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध

दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांतील २५ गावांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे या परिसरात प्रस्तावित प्रदुषित प्रकल्पांना चाप बसणार आहे.…

पोलिसांनी पालकमंत्र्यांचे आदेश पाळले नाहीत

माजी आमदार परशुराम उपरकरांची टिका कणकवली (प्रतिनिधी): जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अवैध धंदे बंद करण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यावेळी पोलीस यंत्रणेला धारेवर धरत कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात पोलीस यंत्रणेने पालकमंत्र्यांचे आदेश पाळले नसल्याचे दिसून येत…

डॉक्टर बिरमोळे यांचे गुरुकृपा हॉस्पिटल, कणकवली / सरस्वती मेडिकल फाउंडेशन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री सत्यविजय जाधव मित्र मंडळ कणकवली आयोजित

आरोग्य तपासणी शिबिर व प्रदर्शन साक्षरता अभियान कणकवली (प्रतिनिधी) : सध्याच्या या धावपळीच्या जीवनात महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. लहान किशोरवयीन मुली असो वा तरुण वृद्ध महिला असो. पुरूष जितका समाजाचा खंबीर आधार आहे तशाच महिला सुद्धा समाजाचा खंबीर…

कोकि म्हणून परिचित ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक विवेकानंद पाटकर यांचे निधन

कणकवलीत हळहळ कणकवली (प्रतिनिधी) : कांबळे गल्ली येथील रहिवासी विवेकानंद भास्कर पाटकर (वय ६३) यांचे राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने शहरातील सामाजिक, धार्मिक व रिक्षा व्यावसायिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. शहरातील ज्येष्ठ रिक्षा व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख…

कणकवलीत भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम सुरू

नगरपंचायतीकडून एजन्सीची नियुक्ती निर्बीजीकरण झाल्यानंतर पुन्हा मूळ ठिकाणी सोडणार कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची पकड मोहीम आजपासून सुरू करण्यात आली. आज (ता. २७) नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा प्रारंभहोणार आहे. पकडलेल्या…

व्यापारी संघ कणकवलीचा ‘प्रज्ञानी’ उपक्रम

स्कॉलरशिप परीक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन कणकवली (प्रतिनिधी) : इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती (स्कॉलरशिप) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रभावी प्रशिक्षण मिळावे, यासाठी कणकवली तालुका व्यापारी संघातर्फे ‘प्रज्ञानी’ या ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भा. ता.…

कासार्डेवासीयांच्या कस्तूरीला भावपूर्ण श्रद्धांजली

कुठलेही गुन्हे घेण्यासाठी आम्ही तयार; ग्रामस्थांची भावना कणकवली (प्रतिनिधी) : वैद्यकीय उपचारादरम्यान मृत झालेल्या कस्तूरी पाताडे हिला आज कासार्डे ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, डॉक्टरांवर कारवाई झाली…

‘त्या’ डॉक्टरला आमच्या हवाली करा; संतप्त ग्रामस्थांची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : डोक्याला असलेली गाठ काढण्याची शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात पार पडल्यानंतर रक्तस्त्राव थांबत नसल्याने कोल्हापूर येथे दाखल केल्यानंतर युवतीचा मृत्यू झाल्याबाबत संतप्त ग्रामस्थांनी अखेर युवतीच्या मृतदेहासह त्या खासगी रुग्णालयात धाव घेतली. ग्रामस्थांनी युवतीचा मृतदेह थेट रुग्णालयाच्या दारावर ठेवला. शस्त्रक्रिया…