Category बातम्या

कोकणवासीयांवर मध्य रेल्वेकडून होणाऱ्या घोर अन्यायाबद्दल खासदार अरविंद सावंत यांचा दिल्लीत आवाज

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : उन्हाळी सुट्ट्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेंच्या बाबत मध्य रेल्वेकडून कोकणवासीयांना दिल्या जाणाऱ्या सापत्न वागणुकीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेट…

कणकवलीतील स्वामी समर्थ केंद्रावर अखंड नाम जप यज्ञ सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, स्वामी समर्थ सेवक व अध्यात्मिक विकास मार्ग, दिंडोरी प्रणित कणकवली केंद्र येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त ९ ते १५ एप्रिल या कालावधीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…

प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त १६ क्षयरुग्णांना पोषण आहार वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील माड्याचीवाडी येथील स्वामी समर्थ मठ येथे प. पू. सदगुरु श्री गावडे काका महाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीचा एक आदर्श वस्तुपाठ सादर करण्यात आला. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या ‘१०० दिवस टीबी मुक्त अभियान’ अंतर्गत, श्री…

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एप्रिल फूल” दिवशी झाडांना केले ‘कूल’

बांदा (प्रतिनिधी): “एप्रिल फूल” म्हटले की, एकमेकांची गंमत, थट्टा आणि खोड्या यांचे वातावरण असते. मात्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी यंदाचा “एप्रिल फूल” दिवस एका आगळ्यावेगळ्या आणि निसर्गप्रेमी पद्धतीने साजरा केला. कुणालाही फसवण्याऐवजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरातील झाडांना पाणी…

आयुष्मान भारत योजनेचा विस्तार; सिंधुदुर्गात खाजगी रुग्णालयांतही मोफत उपचार उपलब्ध

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आता सर्वसामान्य नागरिकांना खाजगी रुग्णालयांमध्येही महागडे उपचार मोफत मिळणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नामांकित खाजगी रुग्णालयांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, प्रशासनाकडून अद्ययावत यादी जाहीर करण्यात…

मालवणात अवकाळी पावसाने रस्ते बनले धोकादायक ; आरोग्य सभापतींची तत्परता

स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मदतीने निसरडे रस्ते केले स्वच्छ स्वतःची वाहने करून दिली उपलब्ध मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरात आज सकाळी अवकाळी पावसाचे आगमन झाले. यामुळे शहरातील वायरी मुख्य रस्त्यावर रिंगीची झाडे असल्याने त्यावरील फळे पडून वाहनांची ये जा असल्याने पूर्ण फेस…

नगरसेविका आर्या राणे यांचा एक फोन आणि स्ट्रीट लाईट सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील जानवली नदीनजीक पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या घरासमोरील सर्व्हिस रोडवरील बंद असलेली स्ट्रीट लाईट नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांनी पुन्हा सुरू करून दिली. सर्व्हिस रोडवरील स्ट्रीट लाईट बंद असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी नगरसेविका आर्या राणे यांच्या…

भोसले इन्स्टिट्यूटच्या १६ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड…

मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी कणकवली (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बजाज ऑटोतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले होते. या निवड प्रक्रियेमध्ये एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाल्याची माहिती कंपनीमार्फत देण्यात…

आता पुढे शिकायचे नाही म्हणत संपवले जीवन

सावंतवाडीत १७ वर्षीय विद्यार्थ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या सुवर्ण कॉलनी परिसरातील घटना : उपचारादरम्यान मृत्यू सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरातील सुवर्ण कॉलनी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शिक्षण घेत असलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घराच्या गॅलरीतून…

गांजाची विक्रीसाठी आलेल्या इसमाच्या कुडाळ पोलीसांनी आवळल्या मुसक्या 536 ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ पोलिसांनी आज एमआयडीसी परिसरात सापळा रचून गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयित आरोपी शुभम संदीप परब (वय 23 वर्ष रा. कुडाळेश्वरवाडी, ता. कुडाळ) यास ताब्यात घेतले. या संशयित आरोपीच्या ताब्यातुन 536 ग्रॅम वजनाचा 26 हजार 800 रुपये किमतीचा…