Category बातम्या

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहीम ; नगरपंचायत प्रशासन सज्ज

विक्रेत्यांना स्टॉल हटविण्याच्या सूचना कारवाईपूर्वी प्रशासनाचा कडक इशारा ; मुख्याधिकारी ऍक्शन मोडवर कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर नगरपंचायत प्रशासन गुरुवारी प्रत्यक्ष मैदानात उतरले. मुख्याधिकारी पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीच्या पथकाने शहरातील विविध भागांची पाहणी…

वारगाव मध्ये ग्रामस्थांनी केली श्रमदानातून परिसर स्वच्छता

तळेरे (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद च्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातून परिसर स्वच्छता या विशेष उपक्रमांतर्गत वारगाव गावात ग्रामस्थांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम 4 जून रोजी सकाळी राबविण्यात आली. आपला परिसर आपली स्वच्छता या उक्तीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या मार्गदर्शनाखाली वारगाव ग्रामपंचायत च्या वतीने…

सामाजिक बांधिलकी जपत संत निरंकारी फाउंडेशनची कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सहकार्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालय परिसरात श्रमदानातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने ४ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत…

चिपी विमानतळ ते गोवा जेट्टीपर्यंत जलवाहतूक सुरु करण्याचा विचार

पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात आयोजित बैठकीत प्रस्ताव सादर मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन आणि वाहतूक सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने मंत्रालयात मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग ते गोवा दरम्यानची वाहतूक व्यवस्था…

मौजे येथील तीन वयोवृद्ध निराधार भावंडांना जीवन आनंद संस्थेचा आधार

खारेपाटण (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील तिरोडा येथील अत्यंत हलाखीच्या व निराधार परिस्थितीत जीवन जगणाऱ्या तीन वयोवृद्ध भावंडांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वंचित निराधार घटकांसाठी कार्य करणाऱ्या जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमने आश्रय देत त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली आहे. वयोवृद्ध दशरथ अर्जुन…

तरंदळे फाटा ओव्हरब्रिज परिसर जलमय; प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरीक व वाहनचालकांना

कणकवली (प्रतिनिधी): आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कणकवली-तरंदळे फाटा ओव्हरब्रिजच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडलगतची गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचले आणि काही वेळातच या परिसराला नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा पर्दाफाश झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात…

कणकवलीत अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी विशेष पथक गठीत

मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे आदेश नगर रचनाकार अक्षता रोळे यांच्याकडे पथकाची जबाबदारी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी विशेष अतिक्रमण हटाव पथक गठीत करण्यात आले आहे. नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले असून नगर…

देवगड–निपाणी आणि विजयदुर्ग–कासार्डे मार्ग होणार हिरवाईने नटलेले; रंगीबेरंगी फुलझाडांच्या लागवडीवर भर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड–निपाणी (६२ कि.मी.) आणि विजयदुर्ग–कासार्डे (५० कि.मी.) या प्रमुख मार्गांवरील वृक्षारोपणाच्या कामांचा आज मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात आढावा घेतला. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करताना परिसर अधिक आकर्षक, नयनरम्य आणि पर्यटनाला पूरक दिसावा यासाठी रंगीबेरंगी फुलझाडांची…

महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत खारेपाटण किल्ला येथे शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येणार

युवकांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार खारेपाटण (संतोष पाटणकर) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर वसलेल्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या खारेपाटण या गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराचा इतिहास विरगळच्या माध्यमातून जिवंत ठेवणाऱ्या खारेपाटण किल्ल्यावर महाराष्ट्र राज्याचे…

मालवणात दीड-दोन वर्षांचा चिमुकला आढळला

पालकांचा शोध सुरू मालवण (प्रतिनिधी) : शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा आढळून आला. विशेष म्हणजे, हा मुलगा काही भटक्या कुत्र्यांनी घेरलेला असतानाही त्याला कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे समोर आले…