Category बातम्या

पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद

जनतेच्या समस्यांचे जलद निवारण करणे हे माझे कर्तव्य – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जनतेच्या अडचणी दूर करणे हे पालकमंत्री म्हणून माझे कर्तव्य आहे. त्यामुळे लोकांशी सातत्याने संवाद साधणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे आणि त्यांच्या समस्या तात्काळ सोडवणे यावर आमचा…

तोरसोळे येथे अवैध दारू जप्त

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तालुक्यातील तोरसोळे पारवळवाडी येथे टाकलेल्या छाप्यात सुमारे ५ हजार ६२५ रुपये किमतीचा गोवा बनावटीचा अवैध दारुसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी तेथील सतीश गंगाराम परब (५०) या संशयिताविरुद्ध कारवाई करण्यात आली…

कणकवलीत पहाटे चोरट्याचा धुमाकूळ

पोलीस ठाण्याजवळच सहा दुकाने फोडली कणकवली (प्रतिनिधी) : शहरात शनिवारी पहाटेच्या सुमारास एका अज्ञात चोरट्याने धुमाकूळ घालत तब्बल सहा दुकाने फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरच ही घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून व्यापारी व…

परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर कारवाई; 20 खलाशांसह नौका जप्त

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाने परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई दि. 04 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3.45 वाजण्याच्या सुमारास निवती समोरील समुद्रात करण्यात आली.…

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सन २०२६ चे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचे हे २० वे वर्ष असून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संस्थापक अध्यक्ष वाय.…

तुकाराम मुंढे यांच्या बदलीविरोधात दिव्यांगांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अलिबाग (प्रतिनिधी) : दिव्यांग विभागात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अचानक झालेल्या बदलीच्या निर्णयाविरोधात रायगड जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी संताप व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. बदलीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी…

अनुभव शिक्षा केंद्र आयोजित पर्यावरण परिषदचे बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण येथे उद्घाटन

मालवण (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र, महाराष्ट्र आयोजित तीन दिवसीय पर्यावरण परिषदेचे मालवण वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे यांचे हस्ते उद्घाटन झाले. सध्याच्या हवामान बदलांचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम, कोकणातील पर्यावरणीय समस्या समजून घेत.पर्यावरणमिञ ही संकल्पना युवकांचे मनात दृढ होणेचे मत…

ओरोस-पिटढवळ नदीजवळ भीषण अपघात

सुदैवाने जीवितहानी टळली सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथील पिटढवळ नदीजवळ आज दुपारी १:१० सुमारास एक भीषण अपघात घडला. केरळवरून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या एका टाटा ट्रॅक वाहनाला हा अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार,…

महिलांसाठी चांगले काम कर

निलम राणेंचा महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर यांना मौलिक सल्ला खासदार नारायण राणेंसह नीलम राणेंची पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत अनुराधा नारकर यांनी घेतली सदिच्छा भेट कणकवली (प्रतिनिधी) : महिलांसाठी चांगले काम कर. सभापतीपदाच्या माध्यमातून जनतेला न्याय दे अशा शब्दांत अवघ्या…

ओझरम प्रीमियर लीग 2026 : क्रिकेटप्रेमींसाठी थरारक जल्लोष 11-12 एप्रिलला

तळेरे (स्वप्नील तांबे) : ओझरम प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींसाठी रंगतदार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ व १२ एप्रिल रोजी ओझरम ग्रीन पार्क मैदान येथे ही स्पर्धा पार पडणार असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या स्पर्धेत ओझरम,…