Category कणकवली

आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्चला विविध सामाजिक उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. या बैठकीत कुडाळ – मालवण चे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १७ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सकाळी…

कणकवली शहराच्या विकासकामांचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी घेऊ नये- समीर नलावडे

सध्या सुरू असलेल्या कामांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला विकास निधी मंजूर झालेली सर्व कामे आमच्या कारकिर्दीतील – बंडू हर्णे कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या विकासासाठी आम्ही सत्तेत असताना पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे विविध विकासकामांसाठी निधीची मागणी करत प्रस्ताव सादर…

सिंधुदुर्गात सेंद्रिय शेतीसाठी अभिनव पाऊल : कणकवलीत जैविक निविष्ठा संसाधन केंद्राचे भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कणकवली ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (BRC) तसेच माती परीक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन डामरे (साटमवाडी), ता. कणकवली येथे उत्साहात संपन्न झाले. सदर भूमिपूजन जमीन मालक…

कणकवली नगरपंचायत येथे जागतिक महिला दिन निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायत, महिला बालकल्याण विभाग, कनकसिंधु शहर स्तर संघ, कणकवली व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन निमित्त खास रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे यांचे दुसरे वर्ष होते. यांचे उदघाट्न कणकवली…

पालकमंत्र्यांकडून मिलिंद मेस्त्री यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन

केक भरवून वाढदिवस केला साजरा कणकवली (प्रतिनिधी) : : पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पालकमंत्र्यांच्या उपस्थितित ओरोस येथे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. स्वतः मंत्री नितेश राणे यांनी…

उपसभापती सोनू सावंत यांचा लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने सत्कार

उपसभापतीपदातून वरवडे गावविकासाला प्राधान्य – सोनू सावंत कणकवली (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या उपसभापती निवडीनंतर माझ्या वरवडे गावात श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडेच्या वतीने माझा झालेला सत्कार भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे. पंचायत समिती सदस्यपदी माझी बिनविरोध निवड झाली त्यामागे माझ्या गावाचा…

कणकवलीत १५ रोजी सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्सचे अधिवेशन

मालवण (प्रतिनिधी) : ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, पुणे शाखा सिंधुदुर्ग विभाग, मालवण यांच्यावतीने जिल्हा अधिवेशनाचे आयोजन १५ मार्च रोजी कणकवली येथे करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी १०.३० वाजता डॉ. नवरे हॉस्पिटलसमोर, मातोश्री मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष एस.ए.…

सुतारवाडी येथे डीपी ट्रान्सफार्मर व रस्त्याबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली पहाणी

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील सुतारवाडी येथे डीपी ट्रान्सफार्मर बसविणे तसेच रस्त्याच्या कामाबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिकांसमवेत चर्चा केली. अनेक महिन्यांपासून येथील नागरिकांकडून डीपी ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी संबंधित…

कणकवलीतील हॉटेल व्यवसायिक अडचणीत

पुढील दोन दिवस हॉटेल सुरू ठेवण्याएवढा गॅस साठा उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील हॉटेल व्यवसायिक यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेलांमध्ये फक्त पुढील दोन दिवस हॉटेल सुरू…

कणकवली बसस्थानकामध्ये स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असणार आहे. मंगळवारी कणकवली बसस्थानकामध्ये या स्मार्ट कार्ड काढण्याच्या सेवेचा शुभारंभकरण्यात आला. एसटीच्या कारभारात…