Category सावंतवाडी

सावंतवाडीत दोन दुचाकी समोरासमोर धडकून दोघे जखमी

अधिक उपचारासाठी रुग्णालय हलविले अनिकेत आसोलकर यांनी केले सहकार्य सावंतवाडी (प्रतिनिधी): दोन दुचाकी समोरासमोर झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ही घटना काल रात्री नऊ वाजता सुमारास शासकीय गोदामा समोर घडली सौरभ मालणकर रा. सालईवाडा व श्रीराम ठाकूर रा…

सावंतवाडीत भर बाजारपेठेत सहा दुकाने फोडली

सुमारे ७ हजारांची रोकड लंपास : चोरटे सीसीटीव्हीत कैद सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील सहा दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या चोरीमध्ये चोरट्यांनी एकूण ७ हजार रुपयांची रोकड लंपास केली…

आखाती देशातील युद्धाची झळ, गावातील शाळा अंगणवाड्यांनासुद्धा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सध्या सगळीकडे गॅस टंचाईचे सावट दिसत असून, गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.या गॅस टंचाईमुळे रोजचा जीवनक्रम बदलल्याचे दिसत असताना गावागावात पूर्वी प्रमाणे चुलीवर जेवण करावे लागत आहे. गॅस सिलेंडर वेळेत मिळत…

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे सन २०२६ चे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचे हे २० वे वर्ष असून जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संस्थापक अध्यक्ष वाय.…

सावंतवाडीत पावसाची हजेरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : तळकोकणात दोन दिवस वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडत असताना आज सावंतवाडी शहरासह, तालुक्यात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली. यामुळे नागरिकांची धांदल उडाली. काही ठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळाले. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असताना आज सावंतवाडीतही…

विकासाच्या नावाखाली पार्किंगसाठी वृक्षतोड ?

सावंतवाडीत फॉरेस्ट अधिकाऱ्यांकडूनच झाडांची कत्तल सावंतवाडी (प्रतिनिधी) : एरवी सर्वसामान्य शेतकरी किंवा गोरगरिबांने एखादे झाड तोडले तर कारवाई आणि चौकशीचा ससेमिरा पाठीशी लावणाऱ्या सावंतवाडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पार्किंग करण्याच्या नावाखाली सावंतवाडी वनविभाग कार्यालयाच्या परिसरात असलेल्या तब्बल दहा हुन अधिक झाडांची कत्तल…

देवबाग समुद्रात एलईडी लाईट्सने मासेमारी करणाऱ्या नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई

रत्नागिरी जिल्ह्यातील नौका; नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात आणली मालवण (प्रतिनिधी) : मालवण देवबाग समोरील सागरी जलधी क्षेत्रात सिंधुदुर्ग मत्स्य विभाग गस्त घालत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील भुवनेश्वरी IND MH 4 MM 3738 या एलईडी लाईट्स प्रकाशझोत लावून मासेमारी करत असलेल्या…

सावंतवाडीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने लेखी निवेदन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा यासाठी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना…

केसरकरांच्या पाठीशी शिवसेना ठाम; ‘उबाठा’ आंदोलनावर संजू परबांचा हल्लाबोल”

सावंतवाडी(प्रतिनिधी) : माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते ठामपणे उभे असल्याचा निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला. काही ‘उबाठा’ पदाधिकारी कुणाकडूनतरी पैसे घेऊन आंदोलन करत असून अशा आंदोलनांमुळे केसरकरांचे महत्त्व कमी होणार…

वृद्धेच्या डोक्यात कोयता घालून खून; जमिनीचा वाद बेतला जीवावर

ओवळीये तील घटनेने सावंतवाडी तालुक्यात खळबळ सावंतवाडी (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओवळीये येथे एक धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली. जमिनीच्या जुन्या वादातून ६५ वर्षीय महिलेचा डोक्यात कोयता घालून निघृण खून करण्यात आल्याने परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.…