Category कोकण

सिंधु सर्च टॅलेंट परीक्षेत चिंदर भटवाडी शाळेचा सर्वेश कदम सिल्व्हर मेडल तर सुजन चव्हाण ब्राँझ पदकाचा मानकरी…!

आचरा (प्रतिनिधी) : जानेवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ-सांगवे आयोजित सिंधु सर्च टॅलेंट परीक्षेत जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीच्या इयत्ता तिसरीतील सर्वेश महेश कदम याने सिल्व्हर मेडल तर सुजन परेश चव्हाण याने ब्राँझ मेडल प्राप्त केले. दोन्हीही…

स्वर्गीय संजय नाईक यांचा जन्मदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमानी साजरा

संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर चे आयोजन चौके (प्रतिनिधी) : वराडकर हायस्कुल कट्टाचे माजी मुख्याध्यापक, ग्रामपंचायत खरारे पेंडूरचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते दिवंगत कै. संजय नाईक यांचा 8 मार्च हा जन्मदिवस पेंडूर, तळीवाडी येथे विविध समाजिक, शैक्षणिक उपक्रमानी साजरा…

सावंतवाडी सभापतीपदी सुस्मिता जाधव तर उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

महायुतीकडून जल्लोष : अभिनंदनाचा वर्षाव सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव व उपसभापती पदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; कणकवलीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक

कणकवली (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत फेसबुकवर अपशब्दात पोस्ट केल्याप्रकरणी कणकवलीतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी सोमवारी कणकवली पोलीस ठाणे गाठले. अभी आचरेकर नावाच्या व्यक्तीने आपल्या…

वेंगुर्ले पं. स. सभापती पदी शंकर घारे व उपसभापती पदी सचिन देसाई

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले पंचायत समितीच्या सभापती पदी महायुती तर्फे शंकर घारे व उपसभापती पदावर सचिन देसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. वेंगुर्ले भाजपा कार्यालयात महायुतीच्या सभेत ही नावे जाहीर करण्यात आली. यांचा कार्यकाल असणार एक वर्षाचा. भाजप तालुका…

स्व. संजय नाईक जयंती दिनानिमित्त ५ किमी स्मृती दौड उत्साहात संपन्न

“ब्युटीज ऑन व्हिल्स” व संजय नाईक स्मृती प्रतिष्ठानचे आयोजन चौके (प्रतिनिधी) : ८ मार्च २०२६ रोजी स्वर्गीय संजय नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली ५ किमी स्मृती दौड उत्साहात पार पडली. स्व. संजय नाईक स्मृतीस्थळ पेंडूर ते ग्रामीण रुग्णालय कट्टा…

धक्कादायक | कोळंब येथे संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबार

सुदैवाने शेलटकर बचावले : हल्लेखोर पसार : पोलिसांकडून शोध सुरु मालवण (प्रतिनिधी) : कोळंब खालची वाडी येथील गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्या दिशेने रविवारी रात्री गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळी त्यांच्या डोक्याच्या बाजूने गेली. घराच्या परिसरात…

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांना ज्ञानदिप पुरस्कार जाहीर !

पुरस्काराची रक्कम रु. एक लाख श्री. वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यासाठी वापरणार – चेअरमन महेश इंगळे मसुरे (प्रतिनिधी) : कोल्हापूर येथील थोर स्वामी भक्त कै. ज्ञानेश्वर हरी काटकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ संस्थेच्या वतीने दरवर्षी ज्ञानदीप पुरस्काराने गौरव करण्या प्रित्यर्थ धार्मिक,…

रेल्वे प्रवासात अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई कुर्ला येथून देवगडला येण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाची दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्याने रेल्वे प्रवासात लंपास केली. यामध्ये जुन्या किमतीनुसार २ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ५०० रुपयांची हँडबॅग असा एकूण २ लाख ५० हजार ५००…

हर्णेआळी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत भावना हर्णे पैठणीच्या मानकरी…!

जागतिक महिला दिनानिमित्त सुदर्शन महिला मंडळाचा उपक्रम बाईक रॅलीसह गुणवंत विद्यार्थी व कष्टकरी महिलांचा गौरव…! कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त सुदर्शन महिला मंडळातर्फे हर्णे आळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत भावना हर्णे यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणीच्या…