Category कोकण

बीएलओ करणार मतदारांची पडताळणी

सावंतवाडीत तहसीलदारांचे मार्गदर्शन सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सावंतवाडी तालुक्यात ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. मतदार यादी संपूर्णपणे स्वच्छ आणि अचूक करण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून ३० जून ते २९ जुलैपर्यंत…

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याकडून मळेवाड, शिरोडा व रेडी येथे लहान व्यावसायिकांना व्यावसायिक छत्र्यांचे वाटप

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : “पावसापासून संरक्षण, सेवाभावातून समर्पण” या ब्रीदवाक्याला साजेसा आदर्श प्रत्यक्ष कृतीतून साकारत महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मळेवाड तिठा, शिरोडा बाजारपेठ आणि रेडी गणपती मंदिर परिसरात लहान व्यावसायिकांना व्यावसायिक छत्र्यांचे वाटप केले. पावसाच्या दिवसांत रोजीरोटी कमावणाऱ्या…

जामसंडेत भीषण अपघात ! उभ्या कारवर दुचाकीची जोरदार धडक; दोघे गंभीर

देवगड (प्रतिनिधी) : देवगड-नांदगाव मार्गावरील जामसंडे येथील गणेशनगर परिसरात बलवान बेकरीसमोर शनिवारी दुपारी सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती…

कुडाळ मालवणचा आमदार, कामगिरी दमदार : रस्ता काँक्रिटीकरणासाठी तब्बल ३०५ कोटींचा निधी

सिंधुदुर्गनगरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालवण देऊळवाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे कामासाठी निधी मंजूर आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार ADB रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत राज्य शासनाची मंजुरी मालवण (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून कुडाळ…

कणकवलीत मोहरमनिमित्त ताबूत फेरी

कणकवली (प्रतिनिधी) : मोहरमनिमित्त वरवडे येथील मुस्लिम बांधवांच्यावतीने कणकवली शहरातून ताबूत फेरी उत्साहात काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात आणि धार्मिक श्रद्धेतून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वरवडे येथून होत ही कलमठ-मुख्य बाजारपेठ-पटकीदेवी, तेलीआळी, छत्रपती शिवाजी…

देवली माळरानावर गव्यांचा कळप, वन विभागाने उपाययोजना करावी

मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील देवली माळरान परिसरात गव्यांच्या कळपाचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात गवारेडे वावरत असल्याची चर्चा होती. मात्र, आता एकाचवेळी गव्यांचा कळप दिसून आल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात…

देवगड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसांचे लोकार्पण; नागरिकांनी एसटीतून प्रवास करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘जिजाऊ’ बस गाड्यांचे लोकार्पण आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीफळ अर्पण करून बसांचे विधिवत पूजन करण्यात आले. श्रीफळ…

पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प देवगडमध्ये येऊ देणार नाही – मंत्री नितेश राणे

देवगड (प्रतिनिधी) : देवगडमध्ये पर्यावरणाला हानी पोहोचेल असा कोणताही प्रकल्प येऊ दिला जाणार नाही. देवगडच्या हिताला बाधा पोहोचेल अशी कोणतीही भूमिका आम्ही घेणार नाही, अशी ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली. ते म्हणाले, “देवगड हे एक कुटुंब आहे. भविष्यात कोणताही…

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी संघटना वाढीसंदर्भात वैभव नाईक यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच बी.एल.ए. नियुक्ती…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विजेता अमित कदम यांचा सत्कार

Mr. Universe स्पर्धेत सिल्वर व ब्रॉन्झ पदक; कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा कणकवली (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डिंग क्षेत्रात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवत Mr. Universe स्पर्धेत सिल्वर आणि ब्रॉन्झ पदकांची ऐतिहासिक कमाई करणारे कोकणचे सुपुत्र अमित अनिल कदम यांचा कणकवली येथील ओम…