Konkan News

Konkan News

आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांना तीन तास धरले रोखून…!

मागण्या मान्य केल्याच्या लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित आचरा, चिंदर, वायंगणी, तोंडवळी ग्रामस्थ झाले होते सहभागी आचरा (प्रतिनिधी) : ऐन दिवाळीपासून आचरा सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात सातत्याने विजेचा लपंडावं चालू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरणला धडक देण्याचा इशारा दिला होता. गुरुवारी…

महाराष्ट्र उद्योजकात विकास केंद्राच्या वतीने अनुसूचित जाती उमेदवारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (BARTI )पुरस्कृत व महाराष्ट्र राज्य उद्योजक्ता विकास केंद्र (MCED) सिंधुदुर्ग यांचे वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवक युवतींसाठी एक महिना कालावधीचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती…

कुडाळ नगरपंचायतीच्या विकासाचा नवा टप्पा!

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आज कुडाळ येथे नवीन नगरपंचायतींना मिळणाऱ्या नागरी सुविधा पुरवण्यासाठी सहाय अनुदान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या भंगसाळ नदीवरील गणेश घाट सुशोभीकरण या महत्वाकांक्षी कामाचा शुभारंभ कुडाळ-मालवणचे आमदार…

दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या पूर्वा हितेश सावंत हिने पटकावले रौप्य पदक

भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा माजी आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रांची येथे संपन्न झालेल्या चौथ्या दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्राची २२ वर्षीय खेळाडू पूर्वा हितेश सावंत हिने महिलांच्या ट्रिपल…

पुंडलिक वरदे… हरी विठ्ठल…!

सालाबाद प्रमाणे कासार्डे, ओटव, असलदे, आयनल येथील वारकरी कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरकडे रवाना कणकवली (प्रतिनिधी) : पुंडलिक वरदे ….हरी विठ्ठल….म्हणत कासार्डे, ओटव, असलदे, आयनल येथील वारकरी एकत्र येत १९८५ पासूनची अखंड परंपरा राखत कार्तिकी एकादशीनिमित्त मंगळवारी सकाळी एस.टी.बसने पंढरपूरकडे रवाना…

वैभववाडी ग्रामीण रुग्णालय येथे ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी दिव्यांग लाभार्थी पडताळणी शिबिराचे आयोजन

वैभववाडी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवानी लाभ घ्यावा वैद्यकीय अधिक्षक डॉ.नरोटे यांनी केले आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्याकडे UDID ( Unique Disability ID card) नाही असे बहुतांश लाभार्थी हे मोठ्या प्रमाणात दिव्यांग असून त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन…

श्रीनिवास रेड्डी खूनप्रकरणाचा तपास वेगात; बेंगलोरमधून तीन संशयित ताब्यात

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गालगत साळीस्ते येथे आढळलेल्या श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर, कर्नाटक) यांच्या खूनप्रकरणाचा तपास गतीमान झाला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांच्या संयुक्त पथकाने बेंगलोरमध्ये सोमवारी रात्री तब्बल तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.…

एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने विक्रम यादव यांचा सत्कार

वैभववाडी (प्रतिनिधी) : एकात्मता वारकरी संप्रदाय कोकण दिंडी कार्तिकी पायी वारी व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्यावतीने सांगली येथे बॉंबे ब्लडग्रुप रक्तदाते  तसेच  बॉंबे ब्लडग्रुप ऑर्गनायझरचे संस्थापक विक्रम यादव यांच्या लोककल्याणकारी कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. जगातील अत्यंत दुर्मिळ असणारा बॉंबे…

शिवशौर्य प्रतिष्ठानाच्यावतीने किल्ले गगनगड येथे दीपोत्सव साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : शिवशौर्य प्रतिष्ठानच्यावतीने किल्ले गगनगड येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी आयोजित करण्यात आलेला दीपोत्सव सोहळा उस्ताहात संपन्न झाला. यावेळी दीपोत्सव व मशाल महोत्सव सोहळा आणि गडदेवता यांचे पूजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण गगनगडावर १००० पणत्या लावण्यात आल्या होत्या यामुळे किल्ले…

मालवणी भाषेला ओळख देणारे गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): भाषेला जगाच्या पटलावरआणणारे जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवारी) दहिसर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून गंगाराम गवाणकर यांच्या तब्येतीत…