Konkan News

Konkan News

मुंबई-गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डेत कारचा अपघात

अपूर्ण कामामुळे नागरिक आणि प्रवाशांचा जीव धोक्यात कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर अपूर्ण काम आणि अरुंद रस्त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. आज पहाटे ६.४५ वाजण्याच्या सुमारास वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी एक कार रस्त्याच्या कडेला कोसळून भीषण…

कणकवली नगर पंचायतच्या प्रारूप आराखड्यावर हरकतींसाठी मुदतवाढीची मागणी

सीटी सर्व्हे नंबर व भू-अभिलेख कार्यालयाच्या संपामुळे जमीनमालकांमध्ये गोंधळ कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगर पंचायत यांनी प्रारुप आराखडा प्रसिद्ध करुन आपल्या कार्यालयात व नगरपंचायत कार्यालयात प्रारुप आराखडा नकाशे देऊन नागरिकांना पहाण्यासाठी उपलब्ध करुन दिले आहेत. सदर आराखड्यात रस्त्यांबरोबर विविध आरक्षणे…

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सतर्क; १०२ नागरिकांची माहिती संकलित सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी महसूल…

कणकवलीत ११ वर्षीय मुलाचा अचानक मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी) : शहरात मंगळवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत ११ वर्षीय अजय लालू चव्हाण याचा अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अजय हा लालू मुन्नापा चव्हाण यांचा मुलगा असून तो सध्या कलमठ गावडेवाडी येथे वास्तव्यास होता.…

श्री लिंगेश्वर मंदिरात रंगोत्सव जल्लोषात; चिमुकल्यांची ‘होळी रे होळी’ची धम्माल

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा तसेच होळी यांसारखे सर्व सण दरवर्षी भक्तीभावाने आणि उत्साहात साजरे केले जातात. याच परंपरेला साजेसा रंग धुळीवंदनानिमित्त पाहायला मिळाला. मंदिर परिसरात चिमुकल्यांनी रंगांची उधळण करत “होळी रे…

होळी दिवशीच कणकवलीत घरफोडी; सोन्यासह रोकड लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : ऐन होळी सणा दिवशीच कणकवली शहरानजीक वागदे गावात घरफोडी करून चोरट्यानी 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 25 हजार रुपये लंपास केले आहेत. वागदे गडनदी पुलानजीक साईपार्क अपार्टमेंट मधील रहिवासी सचिन विलास…

चौके हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन कडून “ज्ञानज्योती शिष्यवृत्ती” प्रदान

चौके (प्रतिनिधी) : ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी संस्थेतर्फे भ ता चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय चौके तालुका मालवण विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना “ज्ञानज्योती शिष्यवृत्ती” रक्कम त्यांच्या खात्यावर प्रदान करण्यात आली. ग्लोबल फाउंडेशन संस्थेतर्फे दरवर्षी ग्रामीण भागातील हुशार होतकरू विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती शिष्यवृत्ती अंतर्गत रक्कम…

खारेपाटण येथे कार आणि ट्रक चा भीषण अपघात

एक ठार; एक जखमी… ऐन होळी सणाच्या वेळी अपघातामुळे खारेपाटण मध्ये हळहळ व्यक्त खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीकच्या नडगिवे धुरी भाटले वाडी बस स्टॉप जवळ आज मंगळावर दि.३ मार्च २०२६ रोजी  भर दुपारी १२.३० च्या…

बोटसेवेमुळे पर्यटन, व्यापाराला नवी गती- नीलेश राणे

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बेटसेवा उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन व व्यापाराला नवी गती मिळणार असून मुंबई कोकण प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे, असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-विजयदुर्ग बहुप्रतिक्षित…

सिंधुदुर्ग नगरीच्या सावलीत तीन पत्तीचा जुगार! पोलिसांची ‘अंदर की बात’ की कोणाचा हप्ता?

खारेपाटण परिसरातही चालतो तीन पत्ती जुगार.. जुगाराला फुटले पेव सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ओरोस येथील सिंधुदुर्ग नगरीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलच्या पाठीमागे दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत तीन पत्तीचा जुगार रंगत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जिल्हा मुख्यालयाच्या…