Category बातम्या

देवगडमध्ये नौका बुडाली

नौकेवरील खलाशांना वाचविण्यात यश नौकेचे कोट्यावधीचे नुकसान देवगड (प्रतिनिधी) : मच्छिमारी करून देवगड बंदरात परतत असताना अलमका ही पर्ससीन नौका वाèयाचा वेग आणि लाटांच्या तडाख्यात सापडल्याने समुद्रात बुडाली. या नौकेवर तांडेलासह १५ ते २० खलाशी होते. या सर्व खलाशांना वाचविण्यात…

सर्व्हिस रोडच्या निकृष्ट डागडुजीवर नगराध्यक्ष पारकर आक्रमक

“वर्षभर खड्डे पडता कामा नयेत; गटारे, पथदीप तातडीने दुरुस्त करा” ऑन फील्ड पाहणीत ठेकेदाराला फैलावर कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका असलेल्या कंपनीकडून शहरातील सर्व्हिस रोडच्या डागडुजीचे काम सुरू असताना निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. याची तात्काळ…

सावंतवाडी पं.स.शिवसेना सदस्यांचा स्वतंत्र गट

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पंचायत समितीवर निवडून आलेल्या शिवसेनेच्या सहा सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. तसे पत्र या सदस्यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना सादर केले. गटनेतेपदी न्हावेली पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पंचायत समिती…

सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर सावंतवाडी नं 2 मध्ये रंगली ‘दुर्गुणांची होळी’

विद्यार्थ्यांनी दिला सामाजिक परिवर्तनाचा संदेश सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध शिक्षण संस्था कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर, सावंतवाडी नं. २ मध्ये होळीचा सण एका आगळ्यावेगळ्या आणि प्रबोधनात्मक पद्धतीने साजरा करण्यात आला. केवळ लाकडे जाळून होळी साजरी न करता, आपल्या…

कणकवली स्टेट बँकेसमोरून दुचाकीची चोरी

कणकवली (प्रतिनिधी) : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ राहणारे देवाशीष सुनील कोरगावकर यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. देवाशीष कोरगावकर यांनी आपली एमएच…

कळसुली येथे ओहोळात सापडलेला मृतदेह शिरवल येथील शंकर कुडतरकर याचा असल्याचे झाले उघड

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कळसुली गावातील एका ओहोळ परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. प्रारंभी मृतदेह अज्ञात असल्याची माहिती समोर येत होती; मात्र नंतर मृत व्यक्तीची ओळख शंकर अनंत कुडतरकर (वय ४८)…

विकासाच्या कोटीच्या कोटी उड्डाणात, सिंधुदुर्गातील शेतकरी-बागायतदारच्या मूलभूत सुविधांकडे सर्वांचे दुर्लक्ष

सन २०२४-२५ ची ई-पिक झालीच नाही. शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार कसा ? ; बळीराजाचा आक्रोश निसर्गाच्या अस्मानी संकटानंतर आंबा-काजू-भात शेतकरी शासनाच्या मदतीवर अवलंबून फोंडाघाट (प्रतिनिधी): सन २००२४-२५ मध्ये जमाबंदी आयुक्त, संचालक भूमी अभिलेख आणि कृषी विभाग यांच्यातील गलथान कामाचा फटका…

कणकवली कॉलेजला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, त्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी विज्ञानामध्ये उच्च शिक्षण घ्यावे व विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या उपजत कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात…

आडवली येथे 20 रोजी श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा!

मसुरे (प्रतिनिधी) : समर्थ गड आडवली येथील श्री स्वामी समर्थ मठात 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. मठातर्फे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. सकाळी ६ ते ९ विधिवत पूजा, सकाळी ९…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा पाटेश्वर मैदान येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दिनाक ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा बांदा पाटेश्वर मैदान येथे खेळवण्यात येणार आहे ह्या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख रुपये व…