Category बातम्या

नारायण राणेंच्या वाढदिवसानिमित्त सायकल रॅली

माजी आमदार अजित गोगटे यांच्या हस्ते शुभारंभ देवगड (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देवगड मंडल भाजप च्या वतीने आयोजित सायकल रॅलीचे माजी आमदार अॅड अजित गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले…

मसदे स्वामी समर्थ मठ येथे 9 एप्रिल रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन !

मसुरे (प्रतिनिधी) : आयुष्मान आरोग्य मंदिर मसदे, विवेकानंद नेत्र रुग्णालय व पिरामल स्वास्थ यांच्या सहकार्याने 9 एप्रिल रोजी श्री. स्वामी समर्थ मठ, मसदे येथे सकाळी 10 ते 1 या वेळेत मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी व मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी…

शिक्षणसेवक प्रशांत तांबे यांचे आकस्मिक निधन; नांदगाव विभागाकडून भावपूर्ण श्रद्धांजली

देवगड (प्रतिनिधी) : आयनल गावचे रहिवासी तसेच म्हळुंगे रानेवाडी (देवगड) येथील शाळेत कार्यरत असलेले शिक्षणसेवक प्रशांत गंगाराम तांबे (वय ३८) यांचे दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत दुःखद व आकस्मिक निधन झाले. प्रशांत तांबे हे दिलखुलास, प्रेमळ आणि कार्यतत्पर व्यक्तिमत्त्व…

मंत्री नितेश राणे यांचा करिश्मा कायम, देवगड – जामसंडेत उबाठा युवा सेनेला पाडले जोरदार खिंडार!

युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केला भाजपात पक्ष प्रवेश मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओमगणेश निवासस्थानी झाला पक्ष प्रवेश देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निनाद…

सावंतवाडीत भर बाजारपेठेत सहा दुकाने फोडली

सुमारे ७ हजारांची रोकड लंपास : चोरटे सीसीटीव्हीत कैद सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील सहा दुकानांना चोरट्यांनी लक्ष्य केल्याची घटना रविवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या चोरीमध्ये चोरट्यांनी एकूण ७ हजार रुपयांची रोकड लंपास केली…

वेंगुर्लेतील सर्वात मोठा वनराई बंधारा पक्का करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून ७४ लाखांचा निधी

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींनी दिलेला शब्द केला पूर्ण सरपंच योगेश शेट्ये आणि सहकाऱ्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात मोठा वनराई बंधारा म्हणून ओळख असलेला केळूस- बापाडतेवाडी तारीसाणा बंधारा अखेर पक्का स्वरूपात सिमेंट कॉक्रिटचा बांधण्याचे काम…

समस्या मांडली… समाधान मिळाले; कृतज्ञतेने पालकमंत्री नितेश राणेंची भावनिक भेट

सिंधुनगरी (प्रतिनिधी) : नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे वेळेत निराकरण झाल्यानंतर व्यक्त होणारी कृतज्ञता ही लोकप्रतिनिधींसाठी मोठा सन्मान असतो. असा हृदयस्पर्शी अनुभव शनिवारी झालेल्या नागरिक संवाद कार्यक्रमात पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला. आरोग्य विभागात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अनेक महिन्यांपासून थकीत राहिलेला पगार…

उंबर्डे बुद्ध विहारात कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

वैभववाडी (प्रतिनिधी) : दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी उंबर्डे येथील बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा वैभववाडी यांच्या वतीने आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या शिबिराच्या अध्यक्षस्थानी व्ही. बी. जुवाटकर (मांगवली) हे होते. शिबिराच्या पहिल्या…

खारेपाटण येथील युवा कार्यकर्ते तेजस राऊत यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील भारतीय जनता पार्टी चे युवा कार्यकर्ते तेजस राऊत यांनी नुकतीच आपल्या वाढदिवशी माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांची त्यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे शुभ आशीर्वाद घेतले. यावेळी खासदार राणे यांनी…

आखाती देशातील युद्धाची झळ, गावातील शाळा अंगणवाड्यांनासुद्धा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सध्या सगळीकडे गॅस टंचाईचे सावट दिसत असून, गॅस सिलेंडर साठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.या गॅस टंचाईमुळे रोजचा जीवनक्रम बदलल्याचे दिसत असताना गावागावात पूर्वी प्रमाणे चुलीवर जेवण करावे लागत आहे. गॅस सिलेंडर वेळेत मिळत…